रत्नागिरी : चिपळुण मध्ये भास्कर जाधवांच्या समर्थकांनी निलेश राणेंच्या ताफ्यावर हल्ला केला आहे. चिपळुण तालुक्यातील मुंबई- गोवा महामार्गा लगत असलेल्या भास्कर जाभव यांच्या कार्यालयासमोरुन निलेश राणेचा ताफा जात असताना त्यांच्यावर भास्कर जाधव यांच्या समर्थकांनी त्या ताफ्यावर दगडफेक केली अशा माहीती आहे.
निलेश राणेंची गुहागर मध्ये सभा होणार होती. त्यासाठी जात असताना चिपळुण मध्ये हा प्रकार घडला. निलेश राणेंचा ताफा याठिकाणी पोहोचण्यापुर्वी भास्कर जाधवांनी निलेश राणेंची सभा होऊ देणार नाही असा इशारा दिला होता. भास्कर जाधव आणि त्यांच्या समर्थकांनी निलेश राणेविरुद्ध घोषणाबाजी सुद्धा दिली. स्वतः भास्कर जाधव यावेळी उसस्थित होते.
या नंतर निलेश राणेंचा ताफा भास्कर जाधवांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर पोहोचताच भास्कर जाधवांच्या समर्थकांनी त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर काही वेळ या परीसरामध्ये प्रचंड राडा पाहायला मिळाला. या प्रकारामुळे मुंबई गोवा महामार्गावर काही वेळ वाहतुक विस्कळीत झाली होती. त्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या वापरुन ही परीस्थिती आटोक्यात आणली.