एमजीएलची इ-मोबिलीटी क्षेत्रात आगेकूच

ही गुंतवणूक जी साखळ्यांमध्ये केली जाणार आहे

    14-Feb-2024
Total Views | 27

MGS
 
 
 
एमजीएलची इ-मोबिलीटी क्षेत्रात आगेकूच

 
ही गुंतवणूक जी साखळ्यांमध्ये केली जाणार आहे 
 

मुंबई : महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) ने सोमवार, १२ फेब्रुवारी २०२४ रोजी ३इव्ही इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीमध्ये ९६ कोटींचे समभाग ओतण्यासाठी त्या कंपनीबरोबर शेअर सबस्क्रिप्शन करारावर (एसएसए) सह्या केल्या. ही गुंतवणूक जी साखळ्यांमध्ये केली जाणार आहे, सामान्य क्लोजिंग तरतूदींच्या अधीन आहे. पहिली साखळी या महिन्याच्या अखेरीला गुंतवली जाणे अपेक्षित आहे.
 
३इव्ही इंडसट्रीज् ही एक २०१९ मध्ये बंगलोर, कर्नाटक मध्ये स्थापन झालेली इलेक्ट्रिक व्हेइकल ओइएम आहे. कंपनी एल५ प्रवर्गातील थ्री-व्हील कार्गो, पॅसेंजर, आणि आयसीई-ते-इव्ही रुपांतरित इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करते. त्यांच्या प्रिमीयम इव्हीज् आघाडीच्या इ-कॉमर्स, रिटेल आणि लास्ट माइल लॉजिस्टिक्स कंपन्यांच्या वाहतूकीच्या गरजा भागवण्यासाठी वापरल्या जातात. या गुंतवणूकीचा उपयोग कंपनीकडून ग्राहकांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, इलेक्ट्रॉनिक्स कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रीत करणाऱ्या आरअँडडी प्रकल्पांना पाठबळ पुरवण्यासाठी आणि बॅटरी-एज-ए-सर्विस(बीएएएस) सह आफ्टर मार्केट सेवा विकसित करण्यासाठी केला जाईल.
 
या प्रसंगी बोलताना आशु सिंघल, एमजीएलचे व्यवस्थापकीय संचालक म्हणाले, “एमजीएल, तिच्या स्थापनेपासून अधिकाधिक हरित पर्यावरणाची समर्थक राहिली आहे. या गुंतवणुकीमुळे लास्ट माईल लॉजिस्टिक सेगमेंटसाठी ईव्ही इकोसिस्टम मजबूत होण्यास मदत होईल, प्रामुख्याने डिझेल वाहनांच्या जागी जलद अवलंब करणे सुलभ होईल आणि कार्बन फूटप्रिंट लक्षणीयरीत्या कमी होईल.
 
एमजीएल अतिरिक्तपणे चार्जिंग किंवा स्वॅपिंग सुविधा उभारण्याची सुविधा देऊ शकते ज्यामुळे 3ev त्याच्या ग्राहकांना खात्रीशीर चार्जिंग पायाभूत सुविधांद्वारे व्यवसायाचा विस्तार करण्यास मदत करू शकते.” सिंघल यांनी पुनरुच्चार केला,“ एमजीएल आपला मुख्य क्षेत्रातील व्यवसाय मजबूत करत आहे आणि त्याचवेळी उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करत आहे. ईव्ही क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे ऊर्जा मूल्य साखळीतील आमच्या उपस्थितीला आणखी पूरक ठरेल. एमजीएल इव्ही क्षेत्रामध्ये सर्वांगीण दृष्टिकोन ठेवते आणि विश्वास ठेवते की EV मूल्य साखळीतील सहभाग त्याच्या उदयोन्मुख टप्प्यात या क्षेत्राला पाठिंबा देण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.”
 
३इव्हीचे व्यवस्थापकीय संचालक पीटर वोकनर म्हणाले, “ एमजीएलने ३इव्ही मध्ये गुंतवणूक करून आमच्या व्यवसायात, व्यवस्थापकीय संचात आणि भवितव्यात तिचा विश्वास व्यक्त करून आमचा मोठा सन्मान केला आहे. एमजीएल आणि इव्ही तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म म्हणून आमच्या वाढत्या व्यवसायामध्ये, केवळ इव्हीज च्या प्रवेगक अवलंबनातूनच नव्हे, तर ३इव्हीच्या मालकीच्या बीएएएस (BaaS) मॉडेलसह उदयोन्मुख बॅटरी इकोसिस्टममध्ये महत्त्वपूर्ण समन्वय आहेत. इव्ही वापरकर्ते, त्यांचे ग्राहक आणि इतर हितसंबंधींसाठी उच्च स्पर्धक टीसीओज् सक्षम करणाऱ्या परिपूर्ण जीवन-चक्रावरील आमचा प्रकाशझोत, आमच्या स्वच्छ तंत्रज्ञानाला मार्केटमधील आवकाशात एक स्पष्ट मूल्य प्रस्ताव देते. एमजीएलच्य मौल्यवान पाठिंब्यामुळे आम्हाला भारतात आणि त्यापलीकडे इव्हीच्या अंतःप्रवेशाच्या आणि व्यापारीकरण झपाट्याने वाढवण्याच्या अनेक संधी दिसत आहेत.”
 
क्रिसिल एमजीएलला व्यवहार सल्लागार होती. एचडीएफसी ३व्हीला व्यवहार सल्लागार होती.
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121