अमरावती/छशिमट आणि आदिलाबाद/दादर दरम्यान धावणार गाड्या
04-Dec-2024
Total Views |
1
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी मध्य रेल्वेने अमरावती ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आदिलाबाद ते दादर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने ( Trains ) घेतला आहे.
गाड्यांचा तपशील
अमरावती- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - २ सेवा
अमरावती येथून दि. ५ डिसेंबर रोजी ५.४५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ५.२५ वाजता पोहोचेल. दुसरे दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. ७ डिसेंबर रोजी ००.४० वाजता सुटेल आणि अमरावती येथे त्याच दिवशी १२.५० वाजता पोहोचेल. या गाडीला बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिकरोड, इगतपुरी, कल्याण आणि दादर इथे थांबेल.
आदिलाबाद - दादर - आदिलाबाद अनारक्षित विशेष - २ सेवा
विशेष ट्रेन आदिलाबाद येथून दि. ५ डिसेंबरला सकाळी ७.०० वाजता सुटेल आणि दादर येथे दुसऱ्या दिवशी ३.३० वाजता पोहोचेल. तर दुसरी विशेष ट्रेन दादर येथून दि. ७ डिसेंबरला ०१.०५ वाजता सुटेल आणि आदिलाबाद येथे त्याच दिवशी १८.४५ वाजता पोहोचेल. ही गाडी किनवट, हिमायतनगर, भोकर, मुदखेड, एचएस नांदेड, पूर्णा, परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, लासूर, रोटेगाव, नगरसोल, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी आणि कल्याण येथे थांबेल.