अभिषेक बच्चनने वैतागून बॉलिवूड सोडण्याचा घेतला होता निर्णय, पण बिग बी यांनी दिला ‘हा’ सल्ला

    04-Dec-2024
Total Views | 51
 
abhishek
 
 
मुंबई : अभिषेक बच्चन सध्या त्याच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींमुळे अधिक चर्चेत आहे. आजवर त्याने अनेक चित्रपटांतून विविधांगी बूमिका साकारल्या. मात्र, अमिताभ बच्चन यांचा मुलगा असूनही त्यांच्यासारखी अभिननय कला त्याचा अंगी नाही असे टोमणे त्याला बऱ्याचदा ऐकून घ्यावे लागले. अभिषेकने नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या अभिनयाच्या क्षमतेवर शंका घेत इंडस्ट्री सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयावर बातचीत केली होती. आणि त्यावेळी वडिल म्हणून अमिताभ बच्चन यांनी कसा आधार दिला होता त्याबद्दलही अभिषेक या मुलाखतीत व्यक्त झाला.
 
अभिषेक बच्चनने आजवर अनेक चित्रपट केले पण त्यातील काही चित्रपट फलॉप ठरले. लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया आणि एकूणच इंडस्ट्रीमधील वातावरणाचा माझ्यावर परिणाम होत होता. यावर बोलताना अभिषेक म्हणाला की, “मी काहीही केलं तरी ते काम चालत नसल्याचं मी माझ्या वडिलांना सांगितलं होतं. मी सर्व प्रकारचे चित्रपट, शैली करून पाहिली. आता मी हे करू शकत नाही. असं मी सांगितलं. पण त्यावळी अमिताभ बच्चन यांनी माझा आत्मविश्वास वाढवत केवळ वडील म्हणून नाही तर इंडस्ट्रीतील एक जेष्ठ अभिनेते म्हणून मला पाठिंबा दिला”.
 
अभिषेकचा आत्मविश्वास खचल्यानंतर अमिताभ बच्चन त्याला म्हणाले होते की,"मी हे तुला तुझे वडील म्हणून नाही तर तुझा ज्येष्ठ म्हणून सांगत आहे. तू तयार कलाकृतीच्या जवळपासही नाहीस. तुला खूप सुधारणा करायच्या आहेत. पण तुझ्या प्रत्येक चित्रपटात मला सुधारणा दिसून येत आहे. यात काही ना काही दडलेले आहे. तुमच्यामध्ये कलाकार म्हणून किती बदल होणार हे तुमच्यावर अवलंबून आहे आणि तुम्हाला मेहनत करायचीच आहे, आणि त्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे तुम्ही काम करत राहाणं.'
 
अभिषेक बच्चनच्या नव्या कामांबद्दल बोलायचे झाल्यास आय वॉन्ट टू टॉक हा चित्रपट २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला. वडील-मुलीच्या नात्याची हृदयस्पर्शी कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121