काबुल : अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यापासून तिथल्या स्त्रीयांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. कट्टरपंथीय समाजघटक आणि लष्करशाहीने मिळून स्त्रीयांच्या पायात गुलामगिरीची बेडी अडकवायला सुरूवात केली आहे. अशातच आता अफगाणिस्तानच्या रहिवासी भागात खिडक्या बसवण्याची परवानगी नाकरण्यात आली आहे. त्याच बरोबर असतील त्या खिडक्यांची छिद्रं बुजवण्याचे आदेश तालिबानच्या सरकारने दिले आहे.
तालिबान सरकारचे प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद माध्यमांशी बोलताना म्हणाले की " स्त्रीयांना जर कुणी स्वयंपाक घरात किंवा बाहेर काम करताना कुणी बघितले तर बीभत्स घटना घडू शकतात त्यामुळे हा फतवा काढण्यात आला आहे. महापालिकेचे अधिकारी आता अशा नव्या इमारतींच्या बांधकामाकडे लक्ष्य पुरवणार आहेत. सार्वजानिक क्षेत्रांमध्ये स्त्रीयांचा वावर कमीत कमी व्हावा हे उद्दीष्ट डोळ्यांसमोर ठेवून तालिबान सरकारने कायदे करायला सुरूवात केली आहे. स्त्रीयांना सार्वजनिक जीवनात गाणं म्हणण्याची किंवा कविता म्हणण्याची परवानगी नाही. त्याच बरोबर स्त्रीयांना घराबाहेर पडताना बुरखा घालण्यची सक्ती केली गेली आहे. प्रसारमाध्यमांवरून स्त्रीयांच्या आवाजातील कार्यक्रम सुद्धा रद्द करण्यात आले आहे. शिक्षण घेणे, रोजगार मिळवणे, सार्वजनिक जीवनात मोकळेपणे वावरणे, या सगळ्यावरच आता तालिबानने टाच आणली आहे.