‘इंडी’ आघाडीच्या ‘डिनर’साठी उध्दव ठाकरे दिल्लीत

    07-Aug-2025   
Total Views |

नवी दिल्ली :  काँग्रेस प्रणित इंडी आघाडीच्या ‘डिनर’साठी उबाठाप्रमुख उध्दव ठाकरे हे गुरुवारी दिल्ली दौऱ्यावर आले.

उबाठा खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारपरिषदेस संबोधित केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकार टिका केली. त्याचप्रमाणे इंडी आघाडी व दोन्ही ठाकरे बंधुंचे एकत्र येणे, याचा काहीही संबंध नसल्याचे सांगून त्यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला.

दरम्यान, सायंकाळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी आयोजित इंडी आघाडीसाठीच्या विशेष डिनरसाठीही ठाकरे उपस्थित होते.