गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले माजी पंतप्रधानांचे अंतिम दर्शन
27-Dec-2024
Total Views | 50
नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉं. मनमोहन सिंग यांचे दिनांक २६ डिसेंबरो रोजी वृद्धपकाळाने निधान झाले. भारताच्या अर्थ क्रांतीचे जनक म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या सिंग यांनी आपल्या कारकीर्दीत अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी त्यांनी अनेक वित्तीय धोरणांची अंमलबजावणी केली.
राजकारणाच्या पलिकडे सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांचा आदर केला. अशातच आता भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मनमोहन सिंग यांच्या दिल्लीतील निवासस्थानी श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा देखील तिथे उपस्थित होते. मनमोहन सिंगजी यांचे स्मरण करताना अमित शाह म्हणाले की मनमोहन सिंगजी हे एक प्रतिष्ठीत अर्थतज्ञ होते. अर्थकारण आणि सार्वजनिक धोरण या बद्दल असलेले ज्ञान यामुळे कायमच ते आपल्या स्मरणात राहतील.