देशातील पहिला दिव्यांग पूरक सिग्नल ठाण्यात

    25-Dec-2024
Total Views | 61
Physically Disable

ठाणे : वाहनांच्या वर्दळीमुळे दिव्यांग ( Physically Disable ) आणि दृष्टीहिनांना रस्ता ओलांडताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. कधी कधी अन्य व्यक्तीवर अवलंबुन राहावे लागते.तेव्हा, वाहतुक सुरक्षा अभियानाचे औचित्य साधुन ठाणे महापालिका आणि ठाणे शहर वाहतुक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील तीनहात नाका सिग्नलवर प्रायोगिक तत्वावर दिव्यांग पूरक (हॅडीकॅप अक्सेसेबल) सिग्नल यंत्रणा कार्यन्वीत करण्यात येणार आहे. अशी माहिती वाहतुक उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी दिली.

ठाण्यात नागरीकरणासोबतच वाहनांची संख्या वाढत आहे. तीनहात नाका, नितीन कंपनी व कॅडबरी जंक्शन, कापूरबावडी - माजिवडा अशा मुख्य चौकात एकाचवेळी अनेक रस्त्यांवर वाहने येतात. या जंक्शनवर सिग्नल यंत्रणा असली तरी डोळस व्यक्तीलाही रस्ता ओलांडताना अडचणींना तोंड द्यावे लागते. तर दृष्टीहीन दिव्यांग व्यक्तींना रस्ता ओलांडताना अडचणी येतात. तेव्हा, दिव्यांग पूरक सिग्नल यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.ठाण्यातील तीनहात नाका सिग्नलवर प्रायोगिक तत्वावर दिव्यांग पूरक (हॅडीकॅप अक्सेसेबल) सिग्नल यंत्रणा बसवली जाणार आहे. यात रेल्वेच्या दिव्यांग डब्याच्या धर्तीवर ध्वनीयंत्रणा (बीपर) असणार आहे. जिथे चढ उतार असतील तिथे छोटे छोटे रॅम्प केलेले असुन तेथील पोलवर हे बीपर असणार आहेत. ही यंत्रणा दिव्यांग व्यक्तींना सिग्नलचा अंदाज लावून सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यास मदत करेल.

दिव्यांग पुरक सिग्नलची पहिली यंत्रणा तीनहात नाका येथे बसवली जाणार असून, भविष्यात नितीन कंपनी, कॅडबरी जंक्शन, कापूरबावडी-माजिवडा यांसारख्या वाहतुकीने गजबजलेल्या चौकांमध्येही ती राबवण्याचा मानस आहे. दिव्यांगांसाठी रस्ता ओलांडणे हा एक आव्हानात्मक अनुभव ठरण्याऐवजी सुलभ आणि सुरक्षित होऊन ठाणे शहराने उचललेले हे पाऊल देशासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी व्यक्त केला आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
उपराष्ट्रपतीपदासाठी ‘इंडी’आघाडीकडून माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर! काँग्रेस अध्यक्षांकडून नावाची घोषणा

उपराष्ट्रपतीपदासाठी ‘इंडी’आघाडीकडून माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर! काँग्रेस अध्यक्षांकडून नावाची घोषणा

(B Sudarshan Reddy Named INDI Alliance Vice President Candidate) उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या इंडी आघाडीकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उपरराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराचे नाव जाहीर केले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील. दरम्यान, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे सीपी राधाकृष्णन विरुद्ध इंडी आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी असा..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121