खोल समुद्रात जावू नका; मंत्री नितेश राणे यांचे मच्छिमारांना आवाहन
19-Aug-2025
Total Views |
मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव मच्छीमारांनी खोल समुद्रात जावू नये, असे आवाहन मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले आहे. मत्स्यव्यवसाय विभागाकडून त्याबाबतचा आदेशही जारी करण्यात आला आहे.
मंत्री नितेश राणे म्हणाले की, "कोकण किनारपट्टीवर सोमवार दि.१८ ऑगस्ट ते शुक्रवार दि.२२ ऑगस्ट दरम्यान वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. या कालावधीत समुद्रातील वाऱ्याचा वेग ४५ ते ५० कि.मी. प्रती ताशी राहणार असून तो ६५ कि.मी. प्रती ताशी पर्यंत जाण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. या कालावधीत समुद्र वादळी वाऱ्यासह खवळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांनी हवामान बदलांवर लक्ष ठेवून सुरक्षेच्या कारणास्तव खोल समुद्रात जावू नये. तसेच किनाऱ्यालगतच्या नागरिकांनीही खबरदारी घ्यावी," असे आवाहन त्यांनी केले आहे.
भरती आणि ओहोटीच्या वेळा पुढीलप्रमाणे :
भरती - सकाळी ९:१६ वाजता - ३.७५ मीटर
ओहोटी - दुपारी ३:१६ वाजता - २.२२ मीटर
भरती - रात्री ८:५३ वाजता - ३.१४ मीटर
ओहोटी - मध्यरात्रीनंतर ०३:११ वाजता (उद्या, २० ऑगस्ट २०२५) - १.०५ मीटर