मुंबई : भारताचे लोकप्रिय पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी ( Atalbihari Wajpeyee ) ह्यांच्या जन्म जयंती ( शताब्दी वर्ष) निमित्त आमदार, नगरसेवक अतुल शाह ह्यांनी मंगळवार दिनांक २४ डिसेंबर २०२४ रोजी ए. के. मुंशी स्कूल, ३रा पांजरा पोळ, सी पी टँक रोड, ह्या शाळेतील गतिमंद विद्यार्थ्यां समवेत सकाळी ११.३० वा. साजरा केला.
सर्वप्रथम याठिकाणी स्व. अटलबिहारी वाजपेयी ह्यांच्या प्रतीमेस माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी ह्या शाळेतील एक विद्यार्थी मिलिंद सोनुले ह्याचा ही वाढदिवस होता म्हणून त्याचाही वाढदिवस ह्या ठिकाणी साजरा करण्यात आला ह्यावेळेस ह्या शाळेतील विद्यार्थी अश्फाक खान ह्याने दोन गाणी गायली ह्यावरून असे ज्ञात होते की ह्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या अंगी किती कलागुण असतील कारण ह्याच शाळेतील विद्यार्थी सुंदर चित्र देखील काढतात आणि त्या चित्रात एव्हढ्या सुंदर कल्पना साकारल्या असतात की आपल्या सारखी सामान्य व्यक्ती देखील त्याची कल्पना करू शकत नाही. तसेच दिवाळीतील विविध प्रकारचे सुंदर कंदील देखील हे विद्यार्थी बनवितात हे मी प्रत्यक्ष अनुभवलं आहे, असे शाह म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना विकसित करण्यासाठी समाजातील मोठ्या सेवाभावी संस्थेने किंवा सरकारी यंत्रणेतील ह्या संबधित विभागाने आपल्या योजनेतून ह्या विद्यार्थ्यांना वाव दिला पाहिजे.ह्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित शिवसेना उपविभाग प्रमुख पद्मजा वेदपाठक व त्यांच्या सहकारी, प्रेम शर्मा, मिनाबेन लेहरू , मनोज चौरसिया , बळवंत गायकवाड, मुकेश गावकर, पप्पुभाई चौरसिया, आश्विन कांबळे, राजा पाटील, हबीब नौरंगे, वीरेंद्र मिस्त्री, राजभर विशेष सहकार्य राहिले ते ह्या शाळेतील व्यवस्थापन समिती, शिक्षक आणि इतर कर्मचारी वृंद सर्वश्री मॅनेजिंग कमेटी मेंबर भारती दोशी, छाया व्यास, प्रिन्सिपल अजीतकुमार चांगण , विशेष शिक्षक व शिक्षिका श्रीमती संगीता कांबळे, योगिता परब, वर्षा डोकरे, दीपाली कांबळे, पूजा रंजक, उज्ज्वला पेटकर, आशा मांजरेकर, छाया भालेकर, अवधूत नेमाने उद्या बुधवार २५ डिसेंबर २०२४ रोजी जय अंबे चौक भुलेश्वर येथे स्व. अटलबिहारी वाजपेयी ह्यांच्या जन्म जयंती ( शताब्दी वर्ष) निमित्त खिचडी वाटप कार्यक्रम सकाळी - ११.३० वा. करण्यात येणार आहे.