बॅडमिंटन सुपरस्टार पी. व्ही. सिंधू उद्योजक दत्ता साईबरोबर अडकली विवाहबंधनात!

उदयपुरमध्ये पार पडला विवाहसोहळा

    23-Dec-2024
Total Views | 25
P V Sindhu

उदयपुर : बॅडमिंटन सुपरस्टार पी. व्ही. सिंधू ( P. V. Sindhu ) आणि व्यावसायिक वेंकट साई दत्ता यांचा विवाह २२ डिसेंबर २०२४ रोजी उदयपुर येथे पार पडला. केंद्रिय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या 'X' अकाऊंटवरुन ही बातमी व्हायरल झाली आहे. हा कार्यक्रम जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीतच पार पाडण्यात आला. त्यामुळे गजेंद्रसिंग शेखावत यांनी दिलेल्या शुभेच्छांनी या लग्नाची बातमी समोर आली.

गजेंद्रसिंग शेखावत यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये सिंधू आणि वेंकट दत्ता त्यांना नमस्कार करताना दिसत आहेत. या लग्नाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील हजेरी लावून वर-वधूला आशिर्वाद दिले. हे लग्न संपुर्णपणे दक्षिण-भारतीय पारंपरिक पध्दतीमध्ये करण्यात आले. या लग्नसमारंभात दाक्षिणात्य पदार्थांसोबतच राजस्थानी पदार्थांचादेखील समावेश होता.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121