वधु-वर सुचक मंडळाच्या संकेतस्थळाचा वापर करत कट्टरपंथी युवकाकडून लव्ह जिहाद

कट्टरपंथी युवकाने राहुल नावाचा वापर करत महिलेचे केले लैंगिक शोषण

    02-Dec-2024
Total Views | 48
 
Love Jihad
 
जबलपूर : मध्य प्रदेशातील जबलपूर येथे लव्ह जिहादचे (Love Jihad)  प्रकरण घडले आहे. एका कट्टरपंथी युवकाने ओळख लपवून वंचित महिलेवर बलात्कार केला. एका कट्टरपंथींनी वधु-वर सुचक मंडळाच्या संकेतस्थळाचा वापर करत एका वंचित महिलेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. यानंतर त्याने संबंधित महिलेवर अनेकदा बलात्कार केला. नंतर तिच्यासोबत विवाह करण्याचे अमिषही दाखवण्यात आले होते. याप्रकरणी आता पीडितेने एफआरआय दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली.
 
याप्रकरणात मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना जबलपूरच्या भगवानगंज पोलीस ठाणे परिसरात घडली आहे. मुहम्मद हुसैन असे महिलेवर बलात्कार करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याने महिलेला तिचे नाव राहुल असल्याचे सांगत पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
 
गेल्या दीड वर्षांपासून ते वधु-वर सुचक मंडळाच्या संकेतस्थळावरून एकमेकांसोबत बोलत होते. कट्टरपंथी युवक आणि पीडितेची एका रेस्टॉरंटमध्ये भेट झाली होती. यावेळी दोघांनी एकमेकांना पसंतही केले होते. यावेळी पीडितेने सांगितले की, तिला कट्टरपंथी युवकाचे खरे नाव राहुल असल्याचा तिचा समज होता. एवढेच नाहीतर तिला विवाह करण्यास जबरदस्ती केली होती. जर विवाह करण्यास नकार दिला तर जीवे मारण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली.
 
दरम्यान, ती ज्या व्यक्तीला राहुल समजत होती ती व्यक्ती मुहम्मद हुसेन आहे अशी माहिती समोर आली आहे. याप्रकरणात आता पीडितेने भगवानगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी युवकावर बलात्कारासह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुहम्मदने राहुल नावाने फेक अकाऊंट बनवले होते. आता त्या संकतस्थळालाही नोटीस बजावण्यात आली होती.
 
मुहम्मद हुसेन याने आणखी अनेक मुलींना अशाच प्रकारे फसवत त्यांच्यावर अत्याचार केले आहेत, याचाही पोलिस तपास करत आहेत. या प्रकरणाचा तपास आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121