नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) ( AIMIM ) या पक्षाने हिंदूविरोधी दंगलीचा आरोपी ताहिर हुसेन यास उमेदवारी जाहिर केली आहे.
पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये दिल्लीत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. याच क्रमाने असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएमने दिल्ली दंगलीतील आरोपी ताहिर हुसेनला निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्तफाबाद मतदारसंघातून ताहिर हुसैन यास तिकीट दिले आहे. ताहिर हुसैन याच्या कुटुंबीयांनीही मंगळवारी ओवेसी यांची भेट घेतली.
ताहिर हुसैन हा यापूर्वी सत्ताधारी आम आदमी पक्षाचा (आप) नगरसेवक होता. फेब्रुवारी २०२० मध्ये दिल्लीत झालेल्या दंगल प्रकरणात तो आरोपी आहे. त्यामुळे आपने त्याची हकालपट्टी केली होती. काही दिवसांपूर्वीच ताहिर हुसैन यास दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला होता, त्यानंतर तो पुन्हा राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा होती.