चेष्टा सहन न झाल्याने मित्राने मित्रावर केला कात्रीने हल्ला
मैत्रीच्या नावाला काळीमा लावणारी घटना
01-Dec-2024
Total Views | 22
आहिल्यानगर : मित्राने चेष्टा केल्याने आपल्या मित्रावर कात्रीने हल्ला करत त्याची हत्या केली आहे. मैत्रीच्या नात्याला काळीमा लावणारी घटना आहिल्यानगर येथील मुकुंदनगर येथे घडली आहे. हल्ला करणाऱ्या युवकाचे नाव हे शमसुद्दीन खान असून मृतकाचे नावे हे जिशान खान असे आहे.
याप्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, जिशान आणि शमसुद्दीन हे दोघेही एकाच मेडिकल स्टोअरमध्ये उभे होते. यावेळी दोघेही एकमेकांची चेष्टा करत होते. तेव्हा जिशानने केलेली मस्करी शमसुद्दीनला सहन झाली नाही. त्याने दुकानात असलेली कात्री घेऊन थेट जिशानवर हल्ला केल्याने जिशान हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शमसुद्दीन हा फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. भिंगार कॅम्प पोलीस शमसुद्दीन खानचा शोध घेत आहे.
दोन मित्रांमधील एकमेकांची मस्करी जीवावर बेतल्याने या घटनेची चर्चा शहरात सुरू झाली असल्याचे वृत्त आहे. याप्रकरणाची गांभीर्याने विचार करणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी बोलून दाखवले आहे.