मुंबई : यंदाच्या लोकसभा ( Lokasabha ) निवडणुकीत जिहादचा एक नवीन प्रकार मुंबई आणि महाराष्ट्राने अनुभवला. ‘व्होट जिहाद’चा नारा मुंबादेवी, भेंडी बाजार, बेहरामपाडा, नागपाडा, मुंब्रा, मीरा रोड येथील नयानगर, मालेगाव अशा विभिन्न वस्त्यांमध्ये दिला गेला. मोठमोठ्या सभा, मशिदी आणि मदरशांमध्ये संमेलने, मेळाव्यांतून ‘व्होट जिहाद’चे नारे दिले गेले. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही जनमत बदलण्यासाठी ‘व्होट जिहाद’चे कारस्थान महाविकास आघाडीकडून रचले जात आहे. त्यामुळे भविष्यात भारत एकसंध ठेवायचा असेल, तर जागरूक राहून मतदान करण्याची वेळ आली आहे.
दि. २२ जानेवारी २०२४ रोजी रामजन्मभूमी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा झाली. मुंबईजवळच्या मीरा रोड येथील नयानगरमध्ये त्यावेळी एक वेगळाच अनुभव आला. राममंदिर मिरवणुकीवर हल्ले, दंगली झाल्या. राममंदिराच्या मिरवणुकीवर अमरावती येथे सुद्धा हल्ले झाले. त्याच नयानगरमध्ये नव्या ‘व्होट जिहाद’चा अनुभव आला. नयानगरच्या २४ बूथमध्ये शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवाराला फक्त ३५४ मते मिळाली, तर उबाठा गटाच्या उमेदवाराला १२ हजार, ५२ मते मिळाली. मोहम्मद अली रोडमधील २० बूथमध्ये अरविंद सावंत यांना ११ हजार मते मिळाली. याच वस्त्यांमध्ये २०१९ साली सावंत यांना फक्त ९१ मते मिळाली होती.
धुळे लोकसभा मतदारसंघातील पाच विधानसभा क्षेत्रात धुळे ग्रामीण, सिंदखेडा, मालेगाव ग्रामीण, बागलाण आणि धुळे शहरात भाजपचे उमेदवार १ लाख, ९१ हजार मतांनी पुढे होते. परंतु, मध्य मालेगाव या मुस्लीम बहुल विधानसभा क्षेत्रात भाजपच्या उमेदवाराला फक्त ४ हजार, ५४२ मते मिळाली, तर काँग्रेसला १ लाख, ९८ हजार, ८७९ मते मिळाली. मालेगाव विधानसभेत काँग्रेसला १ लाख, ९४ हजार, ३२७ चे मताधिक्य मिळाले. त्यामुळे भाजपचे उमेदवार ३ हजार, ८३१ मतांनी पराभूत झाले. उत्तर पूर्व मुंबईत भाजपचे मिहीर कोटेचा पाच विधानसभा क्षेत्रात पुढे होते. परंतु, मानखुर्द या विधानसभा क्षेत्रात उबाठा गटाला १ लाख, १६ हजार, ७२ मते मिळाली, तर मिहीर कोटेचा यांना फक्त २८ हजार, १०१. कोटेचा २९ हजार, ८३१ मतांनी पराभूत झाले. या लोकसभा निवडणुकीत या मुस्लीम वस्त्यांमध्ये जी संमेलने आणि मेळावे झाले, त्यात महाविकास आघाडीने मशिदीचा ‘एफएसआय’ वाढवून देण्यापासून, ‘व्होट जिहाद’, ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लॅण्ड जिहाद’ या मुद्यांवर समर्थन व्यक्त केले. त्यामुळेच त्यांना एकगठ्ठा मतदान झाले.
हिरव्यासाठी भगवा सोडला
मुंबईसह राज्यभरात सरकारी जमिनींवर अतिक्रमण करून विशिष्ट समुदायाचे लोक त्यावर धार्मिक संस्था निर्माण करीत आहेत. विशेषतः मुंबईतील झोपडपट्टी भागांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या जमिनींवर अतिक्रमण करून त्यावर मदरसे उभारले जात आहेत. हा ‘लॅण्ड जिहाद’चा नवीन प्रकार महाराष्ट्रात सुरू झाला आहे. अशा अनधिकृत बांधकामांमुळे सुरक्षेच्या दृष्टीनेही यामुळे धोका आहे. आता ‘व्होट जिहाद’ सुरू झाले आहे. मुस्लीम वस्त्यांमध्ये भाजप उमेदवाराला दोन आकडी मते, तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना तीन-चार आकड्यांमध्ये मतदान झाले. सत्तेसाठी उद्धव ठाकरे ‘व्होट जिहाद’च्या शरणी गेले. भगवा सोडून हिरवे वस्त्र परिधान केले. त्यामुळे भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अशा वृत्तीपासून सावध राहण्याची वेळ आली आहे.