कॅनडातील हिंदू मंदिरावर खलिस्तान्यांचा भ्याड हल्ला

तीव्र निषेध नोंदवत भारताने कॅनडाला सुनावले खडे बोल

    05-Nov-2024
Total Views | 119
Canada

मुंबई : कॅनडामधील ( Canada ) एका हिंदू मंदिरावर खलिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कॅनडामध्ये हिंदूंच्या श्रद्धास्थानावर झालेल्या हल्ल्याचा कॅनडातील भारतीय वंशाच्या खासदारांनी परखड शब्दांत टीका करत पंतप्रधान ट्रुडोंना दहशतवाद्यांना आश्रय देण्यास जबाबदार धरले आहे.

कॅनडातील ब्रॅम्प्टन परिसरातल्या एका हिंदू मंदिरावर खलिस्तानी दहशतवाद्यांनी आक्रमण करत, मंदिरातील हिंदू भाविकांना लक्ष्य केले. यावेळी मंदिरातील भाविकांना अमानवी पद्धतीने मारहाण करण्यात आली. याला प्रत्युत्तर म्हणून मंदिरातील भाविकांनादेखील खलिस्तानी दहशतवाद्यांनी चोप दिला.

पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी त्यांच्या वक्तव्यात इंडो-कॅनडियन कॅनडाचे सर्वोत्तम प्रतिनिधित्व करतात, असे म्हटले होते. पुढे असेही म्हटले की, हिंदू कॅनडियन लोकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे राहू; जेणेकरून ते मुक्तपणे आणि अभिमानाने त्यांच्या धर्माचे पालन करू शकतील. मात्र या घटनेवरून त्यांची ही घोषणा फोल ठरल्याचे दिसत आहे.”

कॅनडातील हिंदू मंदिरावरील झालेल्या हल्ल्याचा खुलासा करत आलोक कुमार पुढे म्हणाले, “कॅनडातील मंदिरावर हल्ल्याची ही पहिली घटना नाही. याआधीही ग्रेटर टोरोंटो, ब्रिटिश कोलंबिया आणि ब्रॅम्प्टनमध्ये हिंदू मंदिरांवर हल्ले झाले आहेत. जस्टिन ट्रुडो यांची लोकप्रियता कॅनडामध्ये घसरली आहे. त्यांच्याच खासदारांनी जाहीरपणे त्यांचा राजीनामा मागितला आहे. त्यांची खुर्ची खलिस्तान समर्थक खासदारांवर आहे. त्यामुळे त्यांचा उघड पाठिंबा खलिस्तानींना आहे, असे दिसते. त्यांच्या या वृत्तीमुळे भारत आणि कॅनडाचे संबंधही बिघडले आहेत. कॅनडाची लोकशाही, कायद्याचे राज्य आणि धर्मनिरपेक्षता या मूलभूत तत्वांचेही उल्लंघन होत आहे. त्यामुळे हिंदू मंदिरावरील हल्ल्याचा आम्ही निषेध करतो.”
जाणीवपूर्वक केलेल्या हल्ल्याचा निषेध

कॅनडामधील हिंदू मंदिरावर जाणीवपूर्वक केलेल्या हल्ल्याचा मी अतिशय तीव्र निषेध करतो. त्याचप्रकारे आमच्या राजनैतिक अधिकार्‍यांवर दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न तितकेच निंदनीय आहेत. अशा प्रकारच्या हिंसक कृत्यांमुळे भारताचा निर्धार कमकुवत होणार नाही. आम्ही कॅनडा सरकारकडून न्यायाची सुनिश्चिती आणि कायद्याचे राज्य कायम राखण्याची अपेक्षा करत आहोत.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान



अग्रलेख
जरुर वाचा
मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

कुंचीकोरवे कैकाडी समाजाची ‘आखाडी जत्रा’ ही केवळ धार्मिक परंपरा नसून, समाजाच्या अस्मितेचा, श्रद्धेचा आणि सांस्कृतिक सातत्याचा जिवंत पुरावा आहे. संत कैकाडी महाराज यांची शिकवण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील योगदानाची परंपरा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन हा समाज सुसंस्कृत, जागरूक आणि समर्पित वाटचाल करीत आहे. हा विशेष लेख या परंपरेचा आणि समाजाच्या सांस्कृतिक-सामाजिक प्रवासाचा साक्षीदार ठरत, त्या अखंड परंपरेच्या गौरवाचा दस्तऐवज ठरावा, हाच उद्देश...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121