शरद पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा भरसभेत केला अवमान
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार घालण्यासाठी केला विरोध
15-Nov-2024
Total Views | 1123
1
इचलकरंजी : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सभा होत आहेत. या सभांमध्ये काही देशविघातक वक्तव्य केली जात आहेत. तर अशातच देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे इचलकरंजी येथील प्रचारासाठी गेले असता त्यांनी दोनवेळा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला असल्याची घटना घडली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शरद पवार यांनी याआधी अनेकदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला आहे. तसेच अनेकदा त्यांनी त्यांच्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज यांचा कधीही उल्लेख केला नाही. सर्वधर्म समभाव मानन्याची विचारधारा असणाऱ्या महाविकास आघाडीला आणि शरद पवारांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा द्वेष का? असा सवाल उपस्थित होतो.
इचलकरंजीच्या सभेत दोनदा विनंती आणि जाहीर घोषणा करुनदेखील शरद पवार @PawarSpeaks छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घालायला अजिबात उठले नाहीत. ढीम्म बसून राहिले.
बाकी बरोबरच आहे म्हणा, त्या वरीजिनल औरंगजेबाने तरी कुठे महाराजांचा सन्मान केला होता तो हे प्रति आलमगीर करतील?… pic.twitter.com/OCaC5nhqke
इचलकरंजी येथील एका सभेमध्ये शरद पवार यांना दोन वेळा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार घालाण्यास विनंती केली गेली. मात्र शरद पवार यांनी याचा विरोध केला. ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार घालण्यासाठी अजिबातच उठले नाहीत, ते ढिम्मपणे बसून राहिले होते.
याप्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करूनही शरद पवार यांना मराठ्यांचे नेते कसे मानतात कळत नाही, असे शेफाली वैद्य यांनी आपल्या X ट्विटवर माहिती दिली आहे. तसेच त्यांनी पुढे औरंगजेबाने तरी कुठे महाराजांचा सन्मान केला होता तो हे प्रति आलमगीर करतील? असा सवाल त्यांनी केला आहे.