आम्ही हिंदू समाज म्हणून एकवटायला हवे : ह.भ.प. शिरीष महाराज मोरे
14-Nov-2024
Total Views | 99
मुंबई : (Shirish Maharaj More) चौदाशे वर्षांपासून भारत आणि हिंदूंवर अन्याय अत्याचार होतच आहेत. ते संपले, असे छातीठोकपणे कोणीही सांगू शकणार नाही. गेल्या कित्येक महिन्यांपासून आम्ही गावागावात जाऊन अनेकांना समजवण्याचा प्रयत्न करतोय. या घटनांविरोधात आम्ही हिंदू समाज म्हणून एकवटायला हवे. ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’, धर्मांतरण हे विष आपल्या घरांपर्यंत पोहोचत आहे. येत्या काळात एक झालो नाही, तर हिंदू रसातळाला जाईल, असे मत संत तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांनी व्यक्त केले. त्यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’सोबत याबाबत संवाद साधला...
‘फूड जिहाद’ नेमका काय आहे?
- माझे स्पष्ट मत आहे की, ’ज्याच्या कपाळी नाही टीळा त्याची खरेदी टाळा’! समाजाने एक व्हा म्हणजे काय तर प्रत्येक ठिकाणी सजग राहायला शिकले पाहिजे. खरेदी ही हिंदूंकडून केली पाहिजे. खाद्यपदार्थांवर थुंकणार्यांचे अनेक व्हिडिओ आपण व्हायरल होताना पाहतो. दुकानाचे नाव हिंदू ठेवले जाते. मात्र, क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर भलतेच नाव दिसू लागते. हादेखील एक प्रकारचा जिहादच नाही का? आम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जातो. त्यावेळी राम कृष्ण हरी, असे लिहिलेले असते. ज्यावेळी आपण ऑनलाईन पैसे देतो तेव्हा बिगरहिंदू नाव क्यूआर कोडवर का दिसू लागते? मनात काळेबेरे असल्याशिवाय असे उद्योग कोण करेल? अशा लबाडांपासून सावध राहणे गरजेचे आहे.
‘लव्ह जिहाद’वर सिनेमाही येऊन गेला. मात्र, अद्याप जनजागृती झालेली का दिसत नाही?
- ‘लव्ह जिहाद’ म्हणजे काय, हे आपल्या हिंदूंना कळत नाही. लव्ह जिहादचा कोणताही प्रकार नसल्याचे अनेकदा हिंदूच म्हणत असतात. प्रेमाच्या जोरावर आमच्या हिंदू भगिनींवर अन्याय-अत्याचार करत केलेले धर्मांतरण म्हणजे ‘लव्ह जिहाद.’ जर प्रेम आहे, तर त्यांनी आमचा धर्म स्वीकारावा! आमच्या मुलींचे विवाहाआधी श्रद्धा नाव असते आणि नंतर तिची शबाना का होते? आपण सर्वधर्म समभाव म्हणतो. पण, प्रेमामध्येही सर्वधर्म समभाव का नको? शेवटी धर्मांतरणच होते. याच ‘लव्ह जिहाद’पासून सावध व्हायला हवे. श्रद्धा नावाच्या हिंदू युवतीसोबत एक युवक दोन वर्षे राहिला आणि नंतर तिचे ३६ तुकडे केले, उरणच्या यशश्री शिंदेने नकार दिला तरीही तिच्यावर तीन दिवस अत्याचार केले. म्हणून हिंदूंनी आधी ‘लव्ह जिहाद’ ओळखायला हवा.
रेल्वे मार्गात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, या कटांबद्दल काय सांगाल?
- शासनाने या घटनांवर कठोर कारवाई करायला हवी. रेल्वे घातपाताचे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. पुरावे आढळल्यास अशा समाजकंटकांवर कारवाई व्हायलाच हवी.
गोमातेला राज्यमातेचा दर्जा मिळाल्यानंतरही गोवंश हत्यांचे प्रमाण का कमी होताना दिसत नाही?
- वारकरी संप्रदाय म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवभक्त म्हणून, हिंदू म्हणून, एकच सांगेन की, वारकरी संप्रदायासह हिंदू धर्माला गाय ही मातेसमान आहे. नुकतेच शासनाने गाईला गोमातेचा दर्जा दिला. त्यामुळे गोमातेचे रक्षण व्हायला हवे. गाईला आपल्या हिंदू धर्मात पूर्वीपासूनच मातेसमान मानले जाते. त्यामुळे देशी गोमातेचे रक्षण व्हावेच. गोमातेची होणारी तस्करी थांबवण्यासाठी सरकारने कठोर कारवाई करत कायदेही कठोर करावे.
मौलाना सज्जद नोमानींसारख्यांनी शंभर टक्के मतदानासाठी फतवा काढला आहे. हिंदू मतदार म्हणून तुम्ही या गोष्टीकडे कसे पाहता?
- जसे विशिष्ट धर्मीय जर विशिष्ट धर्मासाठी मतदान करत असतील, तर हिंदूंनी हिंदू म्हणूनच मतदान करायला हवे. काही दिवसांपूर्वी आणखी एका मौलानाने फतवा काढला की, जो हिंदू साधूंवर बोलेल त्या हिंदू उमेदवाराला मतदान करायचे नाही. जे हिंदू साधूंविरोधात आहेत त्यांना मतदान करू नका, असे संत तुकाराम महाराज यांचा वारसदार म्हणून छाती ठोकपणे सांगतो. ‘उलेमा बोर्ड’च्या १७ मागण्या काहींनी मान्य केल्या. कट्टरपंथींच्या मतांसाठी होणारे लांगुनचालन होत आहे. जर हिंदूंनी हिंदूंवर दबाव निर्माण करून मतांसाठी दुसरीकडे तुम्ही चादरीवर फुले वाहता, हे काही बरोबर नाही. त्यासाठी हिंदूंनी एक व्हावे. ’जो हिंदुत्व की बात करेगा, वही देश पर राज करेगा’.
कानिफनाथ देवस्थानाच्या जमिनीवर ‘वक्फ बोर्डा’ने दावा करणे या गंभीर घटनेबाबत आपले मत काय?
- सर्वात आधी ‘वक्फ’चा अर्थ हिदूंनी जाणून घ्यावा. वक्फ म्हणजे इस्लामचे दान. १९५४ साली ‘वक्फ बोर्ड’ची स्थापना करण्यात आली. आज देशात जवळजवळ दहा लाख एकरांचा सातबारा ‘वक्फ’ने लुटलेला आहे. जर ‘वक्फ’ने एखाद्या जागेवर दावा केला, तर ती जागा ‘वक्फ’ची होईल ही साधी सोपी गोष्ट समजून घ्यावी. या सर्वांविरुद्ध आपण कोणत्याही न्यायालयात जाऊ शकत नाही. जर हिंदूंना हिंदूंच्या जमिनी वाचवायच्या असतील, तर ताकदीने विरोध करणे गरजेचे आहे. नाहीतर हे लोक प्रत्येक जागेवर दावा करत दंगली करण्यासाठी मागे पुढे पाहणार नाहीत. हेच प्रकरण आता राजश्री शाहू महाराज यांच्याबाबतही झाले आहे. ‘मोहमेडन एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना केली, तसेच त्याठिकाणी असलेल्या मुस्लीम बोर्डिंगच्या जागेवर दावा केला. याची एकूण किंमत तीन हजार कोटी एवढी असून, ती जागा ‘वक्फ’ने आपल्या ताब्यात घेतली आहे. हे जर असेच सुरू राहिले तर देशात आपल्याला जाळण्यासाठी स्मशानही शिल्लक राहणार नाही.