ठाण्याच्या गल्लीगल्लीत संजय केळकरांच्या प्रचाराचा झंझावात!

मातृशक्तीकडुन केळकरांवर पुष्पवर्षाव

    10-Nov-2024
Total Views | 26
Sanjay Kelkar

ठाणे : भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार संजय केळकर ( Sanjay Kelkar ) यांनी रविवारी पहाटे हिरानंदानी इस्टेट भागात मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांची भेट घेऊन सकाळी जोरदार प्रचार रॅली काढली. या रॅलीचा श्रीगणेशा चंदनवाडीतील रायगड गल्ली परिसरातील श्री गणेश मंदिरातील बाप्पाच्या दर्शनाने झाला. रविवार असल्याने सुट्टीच्या दिवशी मतदारांशी संवाद साधल्याने या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे पाहण्यास मिळाले. यावेळी महिलांनी औक्षण सुद्धा केले. पाचपाखाडी, चंदनवाडी, नामदेववाडी परिसरातील गल्ली गल्लीतुन एकवटलेल्या मातृशक्तीने संजय केळकर यांच्यावर पुष्पवर्षाव केला.

रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास संजय केळकर यांची प्रचार रॅली पाचपाखाडी, चंदनवाडी येथील रायगड गल्लीतुन सुरू झाली. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार, अशोक राऊळ, शिवसेना माजी नगरसेविका रुचिता मोरे, शिवसेनेचे हेमंत पवार, भाजपचे महेश कदम , प्रकाश राऊळ आदींसह महायुतीचे पदाधिकारी - कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने महिलावर्ग प्रचारात सहभागी झाले होते.

रायगड गल्ली ते चंदनवाडी, टेकडी बंगला, ओपन हाऊस चौक, पांचपाखाडीवरून डावीकडे, खळे कंपाऊंड, सर्विस रोड मार्गे,साबळे वाडी नितीन कंपनी चौक, नामदेव वाडी येथील गावदेवी मंदिरात केळकर यांनी गावदेवीचे दर्शन घेतले, तेथुन साईबाबा मंदिरात दर्शन करून मीनल छाया सोसायटी कडून डाव्या बाजूने तुळजाभवानी मंदिरातही देवीचे दर्शन घेतले.

प्रचार रथ अविरत दौडत कॅडबरी जंक्शनवरून खोपट एसटी वर्कशॉप मार्गे जोंधळीबाग, नूरी बाबा दर्गा रोड, रूपादेवी मंदिर चौक, गौरीशंकर सिद्धिविनायक मंदिर ठाणे महापालिका चौक, कचराळी तलाव येथे रॅलीचा समारोप झाला. या रॅलीत ठीक ठिकाणी केळकर यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. याचदरम्यान, चाळीमधील महिलांनी प्रत्येक घरात जाऊन आम्ही प्रचार करणार असा विश्वास केळकरांना दिला. प्रत्येक सोसायटी आणि मंडळाकडून केळकरांनी ओवाळणी केली असून प्रत्येक सोसायटीने केळकरांना मतदान करण्याचे आश्वासित केले आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121