मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम आहे. मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मनसेकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली. अमित ठाकरेविरोधात शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे महेश सावंत हे मैदानाच उतरले आहेत. काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे गटाचे महेश सावंत हे मैदानात उतरले आहेत. काही दिवसांआधी अमित ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि ते आता प्राचारासाठी लोकांच्या घरोघरी जात प्रचार करत आहेत.
अमित ठाकरेंकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात झाली आहे. अमित ठाकरे हे सध्या माहीम विधानसभा मतदारसंघात प्रचार करत आहेत. यावेळी त्यांची पत्नी मितालीही प्रचारासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. यावेळी अमित ठाकरे यांनी माध्यमांशी बोलत असताना संवाद साधला आहे.
अमित ठाकरे काय म्हणाले?
माहीम मतदारसंघात प्रचार करत असताना अमित ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मी माझं व्हिजन लोकांपर्यत मांडत आहे. मतदारांनी कोणाला मतदान करावे हे मी सांगत असल्याचे अमित ठाकरे म्हणाले आहेत. मी आता एका घरात गेलो, तेव्हा मला त्यांनी सांगितलं, असा प्रचार कधीही झालेला नाही. आमच्याकडे कोणीही आलेले नाही. मी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे मतदारांनी कोणाला मतदान करायचे हे त्यांना समजायला हवं, असे अमित ठाकरे म्हणाले आहेत.
मतदारसंघातील लोकांचा अधिक कल आहे. ते सेल्फीही काढतात, ओवाळतात. मला शुभेच्छा देतात. मी २००९ साली अशाचप्रकारे फिरलो होतो. मात्र आता ही निवडणूक माझ्यासाठी अवघड नसल्याचे अमित ठाकरे म्हणाले आहेत.