आक्षेपार्ह फोटो काढून मैत्रिणीला ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाची निर्घृण हत्या

मैत्रिणीसह तिच्या साथीदाराला कोपरी पोलिसांकडून अटक

    04-Oct-2024
Total Views | 79

Thane Murder
 
ठाणे : विवाह समारंभात झालेल्या ओळखीतुन २० वर्षीय तरुणीला गुंगीचे औषध देत तिचे आक्षेपार्ह फोटो काढून ब्लॅकमेल करणाऱ्या स्वयंम सतीश परांजपे (३३) या तरुणाची कोयत्याने ३० वार करून निघृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी, कोपरी पोलिसांनी मयुरेश नंदकुमार धुमाळ (२४) याच्यासह पिडित तरुणीला अटक केली असुन त्यांच्याकडून धारदार कोयता आणि कटर हस्तगत करण्यात आला आहे. ही घटना कोपरीतील अष्टविनायक चौकातील संचार सोसायटीतील घरात घडला.
 
ठाणे पश्चिमेकडील चेंदणी कोळीवाडा येथे राहणाऱ्या २० वर्षीय पिडित तरुणीशी संचार सोसायटीत भाड्याच्या घरात राहणाऱ्या मृतक स्वयंम याचा एका विवाह समारंभात परिचय झाला होता. नंतर भेटीगाठी वाढून त्यांच्यात सलगी झाली. कारमधुन फिरण्याच्या बहाण्याने पाण्यामध्ये गुंगीचे औषध पाजुन स्वयंम याने तिचे आक्षेपार्ह फोटो काढले. या फोटोंची भिती दाखवुन ब्लॅकमेल करून तो वारंवार भेटीसाठी सतावु लागल्याने तिने ही बाब आपला साथीदार मयुरेश धुमाळ याला सांगितली. त्यानंतर मयुरेश व पिडित तरुणीने शुक्रवारी सकाळी स्वयंम याला त्याच्या कोपरीतील घरात गाठून फोटो डिलीट करण्याची विनवणी केली. तेव्हा झालेल्या वादात रागाच्या भरात मयुरेशने कोयत्याचे ३० वार करून स्वयंम याची निर्घृण हत्या केली.
 
तसेच, हत्येनंतर आरोपी मयुरेशने स्वतःच पोलिसांकडे आत्मसमर्पण करून हत्येची कबुली दिली. हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी आणलेला कटर पोलिसांनी जप्त केला असुन अधिक तपास कोपरी पोलीस करीत आहेत.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

कुंचीकोरवे कैकाडी समाजाची ‘आखाडी जत्रा’ ही केवळ धार्मिक परंपरा नसून, समाजाच्या अस्मितेचा, श्रद्धेचा आणि सांस्कृतिक सातत्याचा जिवंत पुरावा आहे. संत कैकाडी महाराज यांची शिकवण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील योगदानाची परंपरा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन हा समाज सुसंस्कृत, जागरूक आणि समर्पित वाटचाल करीत आहे. हा विशेष लेख या परंपरेचा आणि समाजाच्या सांस्कृतिक-सामाजिक प्रवासाचा साक्षीदार ठरत, त्या अखंड परंपरेच्या गौरवाचा दस्तऐवज ठरावा, हाच उद्देश...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121