एअर इंडियावर होणार हल्ला, खलिस्तानी पन्नूनची दर्पोक्ती
21-Oct-2024
Total Views | 34
नवी दिल्ली : एअर इंडियाच्या विमानात प्रवास करू नये अशी धमकीचे वृत्त काही दिवसांपासून येत आहे. 1 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर दरम्यानच्या काळात विमानांवर हल्ला होण्याची शक्यता आहे. या हल्ल्याची धमकी देणारा दुसरा तिसरा कोणीही नसून तो खलिस्तानी गुरपतवंत सिंह पन्नून असल्याची माहिती आहे. त्यांनी विमानांवर हल्ला करणार असल्याची धमकी दिली आहे.
खलिस्तानला भारतापासून विभक्त करण्यासाठी पन्नून सक्रिय आहे. काही दिवसांआधी झालेल्या भारताच्या स्वातंत्र्य दिनी राष्ट्रध्वज फडकवण्यापासून खलिस्तान्यांनी विरोध दर्शवला होता. दरम्यान, यावर्षी शीख दंगलीला ४० वर्षे पूर्ण होत असताना हा इशारा देण्यात आल्याची माहिती आहे. त्यावेळी विमान कंपन्यांना दररोज बॉम्बस्फोटाच्या नावाने धमक्या येत आहेत.
विमान प्रवाशांना घाबरवण्याची पन्नूनची ही पहिलीच वेळ नाही. याआधी अनेकदा पन्नूनने विमान प्रवाशांना धमकावले होते. त्याचा एक व्हिडिओ जारी करण्यात आल्याची माहिती आहे. त्यात त्यांनी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव १९ नोव्होंबर २०२३ पर्यंत बदलायला हवे किंवा त्या दिवशी ते बंद ठेवणे गरजेचे असावे, असे सांगण्यात आले आहे.