मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात 'संविधान मंदिरा’चे उद्घाटन

    14-Oct-2024
Total Views | 51

CONSTITUTION TEMPLE
 
मुंबई : (Constitution Temple)भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय राज्यघटना ही सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. लोकशाहीच्या मूल्यांची जोपासना करण्यासाठी, तसेच भारतीय राज्यघटनेबाबत नवीन पिढीत जागृतीसाठी संविधान मंदिर हा उपक्रम कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येत आहे. सोमवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात स्वच्छता कर्मचारी जया दीपक चव्हाण, केशव परमार, प्रतिमा विलास मांगळे यांच्या हस्ते ‘संविधान मंदिरा’चे उद्घाटन करण्यात आले.
 
कौशल्य विकास विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय अंतर्गत ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'संविधान मंदिरांची स्थापना कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून करण्यात आली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि आपले संविधान आणि त्याचे महत्व, 'संविधान मंदिरांच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम नक्कीच महत्त्वपूर्ण ठरेल.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121