अल्पवयीन मुलीवर 'मोईन खान'ने केला बलात्कार; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन धर्मांतरणाचा प्रयत्न

    19-Jan-2024
Total Views | 112
 Moin Khan
 
भोपाळ : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या मोईन खानला पोलिसांनी अटक केली आहे. मोईन खानने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन, त्यानंतर तिचा व्हिडिओ बनवला होता. व्हिडिओ दाखवून त्याने मुलीवर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकला, असा आरोप आहे.
 
संपूर्ण प्रकरण इंदूरच्या परदेशीपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी लाल गली येथील रहिवासी मोईन खान याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी बलात्कार, पॉक्सो कायदा आणि लव्ह जिहादच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला. त्यानंतर महिला पोलिस अधिकाऱ्यांनी अल्पवयीन मुलीचे बंद खोलीत जबाब घेतले. तपासाअंती आरोपीला ताब्यात घेऊन १४ जानेवारी २०२४ रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली.
 
मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या वडिलांनी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत सांगितले होते की, त्यांची १२वी वर्गातील मुलगी बराच वेळ घरात शांत राहायची. चौकशी केली असता मोईन खान तिचा छळ करत असल्याचे समोर आले. आरोपीने आपल्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याचा आरोपही वडिलांनी केला आहे. १७ सप्टेंबर २०२३ रोजी मोईन आपल्या मुलीला तिच्या वाढदिवसाच्या दोन महिन्यांनंतर परदेशीपुरा येथील बिचौली मर्दाना भागातील हॉटेलमध्ये घेऊन गेला होता. तेथे त्याने त्यांच्या अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
 
मुलीने विरोध केल्यावर त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्या शरीरसंबंधाचा व्हिडिओ बनवला. मोईन खानने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडितेच्या वडिलांनी केला आहे. मोईन खानने मुलीला इस्लाम स्विकारण्याचा दबाव सुद्धा टाकल्याचा आरोप आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121