नाशिकमध्ये थरार! चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा भीषण स्फोट, तीन जण जखमी

    27-Sep-2023
Total Views | 197

Mobile


नाशिक :
नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा जोरदार स्फोट झाला आहे. यात तिघेजण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे नाशिक शहरात एकच गोंधळ उडाला आहे. आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
 
मोबाईल नामक उपकरण आज सर्वांच्या जीवनात महत्त्वपूर्ण झाले आहे. या मोबाईलचे अनेक फायदे तर आहेतच, शिवाय तो व्यवस्थित हाताळता येणेही अतिशय महत्त्वाचे आहे. मोबाईल चार्जिंगच्या बाबतीत वारंवार आपल्याला अनेक सुचना दिल्या जातात. परंतू, सगळेच जण याकडे गांभिर्याने लक्ष देत नाहीत. अशावेळी त्याचे परिणामही भोगावे लागतात.
 
नाशिक येथील उत्तमनगर परिसरात एका चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याने घराच्या काचा फुटल्या आहेत. या स्फोटामुळे आग भडकून घराचे नुकसान झाले आहे. तसेच आजूबाजूच्या घराच्या काचादेखील फुटल्या आहे. याप्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
 
तुषार जगताप, शोभा जगताप, बाळकृष्ण सुतार अशी जखमींची नावे आहेत. यातील एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमींवर उपचारासाठी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या स्फोटामुळे नाशिक परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121