सीपीआय नेत्यांच वादग्रस्त विधान; मळापासून बनलेल्या गणपतीची पुजा कशी करता?
इंडी आघाडीच्या आणखी एका नेत्याचं हिंदुविरोधी वक्तव्य
26-Sep-2023
Total Views | 97
चेन्नई : गेल्या काही दिवसापासून देशात सनातन विरोधी वक्तव्य केली जात आहे. अशातच आता सीपीआय राज्य सचिव मथुरासन यांनी पॅरी कॉर्नर चेन्नई येथील कॅडर बैठकीत गणपतीबद्दल वादग्रस्त विधान केलं.
#TamilNadu CPM @tncpim state secretary Mutharasan abused Ganesh ji n Maa Parvati- One more INDI Alliance partner jumps in to abuse #SanatanDharma! While speaking at CPI party cadre meeting at Parry's corner Chennai, he has arrogantly said that there is no law to congratulate… pic.twitter.com/A7G58CvX9s
मथुरासन म्हणाले की, पार्वतीच्या मळापासून गणपती बनलेला आहे , असं सांगितलं जातं.मग मळापासून बनलेल्या गणपतीची पुजा कशी करता? असा सवाल मथुरासन यांनी उपस्थित केला. तसेच गणपतीची पुजा करू नये ,असे वादग्रस्त विधान ही त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे इंडी आघाडीच्या आणखी एका नेत्यांच हिंदुविरोधी विधान समोर आले.
दरम्यान सनातन धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांना नोटीस बजावली आहे. त्यांच्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकार, ए राजा, सीबीआय आणि इतर पक्षांनाही नोटीस बजावली आहे.