अॅपलचे पुढील लक्ष ' मेक इन इंडिया '. ४ वर्षात ४० कोटींचे लक्ष्य
नवी दिल्ली: जगातील पायोनियर, दर्जेदार इलेक्ट्रॉनिक उत्पादनातील अॅपल ने ४ वर्षात ४० कोटींचे लक्ष ठेवले आहे. मेक इन इंडिया संकल्पनेला बुस्टर डोस म्हणून कंपनीने मोठ्या प्रमाणात आयफोन निर्मितीसाठी लक्ष केंद्रीत केले आहे. पीटीआयचा बातमीनुसार या पहिले कंपनीने या आर्थिक वर्षांपूर्वी ७ कोटीचे लक्ष पूर्ण केले आहे.
ही माहिती सूत्रांनी दिली असली तरी यावर कोणतेही विधान अॅपल कडून आलेले नाही. सध्याच्या काळातही आयफोन १५ ची विक्री आयफोन १४ च्या लाँच डेटला दुप्पट वेगाने झाली आहे. आता नुकतेच कंपनीने आयफोन १५, आयफोन १५ प्लस स्मार्टफोन बाजारात लाँच केले आहेत.
यापैकी भारतीय उत्पादनात लॅपटॉप, आयपॅड वर लक्ष केंद्रित न करता मोबाईल फोन वर कंपनीचा भर असणार आहे. फ्लॅगशिप स्मार्टफोन सेगमेंट मध्ये ५९ टक्के मार्केट शेअर ग्रहण करून आहे.यामुळेच अॅपलचे विशेषतः भारतात उत्पादन निर्मिती वाढवण्यासाठी मनसुबे आहेत.