जेपी मॉर्गनने बाँडचा समावेश केल्याने गुंतवणूकदारांसाठी व्याप्ती व रूपयाचे मूल्य वाढणार - व्ही अनंथा नागेश्वरन
मुंबई: मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंथा नागेश्वरन यांनी शुक्रवारी बोलताना 'पुढील वर्षापासून जेपी मॉर्गनच्या बेंचमार्क इमर्जिंग मार्केट इंडेक्समध्ये भारत सरकारच्या बाँड समावेश केल्याने गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूकीची व्याप्ती वाढेल आणि त्यामुळे रुपयाचे मूल्य वाढू शकेल.'
जागतिक वित्तीय फर्म जेपी मॉर्गनने म्हटले आहे की जून 2024 पासून भारतीय सरकारी बाँड किंवा सरकारी सिक्युरिटीज (G-Secs) आपल्या बेंचमार्क उदयोन्मुख बाजार निर्देशांकात समाविष्ट करण्याची त्यांची योजना आहे.ज्यामुळे सरकारसाठी कर्ज घेण्याचे मूल्य कमी होऊ शकते.
G-Secs चा समावेश 28 जून 2024 ते 31 मार्च 2025 या 10 महिन्यांच्या कालावधीत लागू होईल,जो त्याच्या निर्देशांकाच्या इंडेक्स Weight मध्ये एक टक्का वाढ दर्शवेल.
"साहजिकच, सरकारी बाँड गुंतवणूकदारांचा आधार वाढवेल आणि यामुळे भारतीय वित्तीय संस्थांना सरकारी बाँडचे सर्वात मोठे खरेदीदार किंवा सदस्य बनण्यापासून मुक्तता मिळेल आणि तेच प्रत्यक्षात पैसे विधायक हेतूंसाठी खाजगी क्षेत्र,व्यावसायिक क्षेत्र,व्यक्ती यांना कर्ज पुरवठा करू शकतील असे नागेश्वरन यांनी पत्रकारांना सांगितले.
एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, 2003 ते 2008 या काळात भारतात भांडवलाचा ओघ वाढला होता त्याचप्रमाणे चलनाचे मूल्य वाढण्याची प्रवृत्ती असेल.
भारतीय सरकारी रोखे खरेदी करण्याची गुंतवणूकदारांची मागणी आहे. त्यामुळे त्या अर्थाने,जेव्हा निर्देशांकाचा समावेश होऊ लागतो किंवा गुंतवणूकदारांकडून भारत सरकारच्या बाँडची मागणी वाढू लागते तेव्हा चलनात वाढ होण्याची शक्यता असते,"असे ते पुढे म्हणाले.
2020-21 च्या अर्थसंकल्पीय भाषणात बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन,"देशांतर्गत गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असण्याव्यतिरिक्त,अनिवासी गुंतवणूकदारांसाठी (NRI) यांच्यासाठी काही विशिष्ट श्रेणी सरकारी सिक्युरिटीज पूर्णपणे उघडल्या जातील."हे शासकीय निर्णय दीर्घकाळ प्रलंबित होते.कर आकारणीसह काही समस्या देखील होत्या,ज्या सरकारने गेल्या अनेक महिन्यांत सोडवल्या आहेत.