ब्रेकिंग : कोटक महिंद्राचे संस्थापक अध्यक्ष उदय कोटक यांचा राजीनामा

    02-Sep-2023
Total Views | 30
 
 
ब्रेकिंग : कोटक महिंद्राचे संस्थापक अध्यक्ष उदय कोटक यांचा राजीनामा
 

मुंबई:   प्रसिद्ध कोटक महिंद्रा बँकेची मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक यांनी १ सप्टेंबरला आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. बँकेकडून एक्सचेंज मार्केटला यासंबंधीची माहिती आज कळवली आहे.
 
एक्सचेंज मध्ये दिलेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर पासून हा राजीनामा लागु झाला आहे ‌. कोटक यापुढे कंपनीचे नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून कार्यभार सांभाळतील.
 
 
कोटक यांनी आपल्या भावना X वर व्यक्त करताना, संस्थापक म्हणून,  " मी ब्रँड कोटक शी खोलवर जोडलेला आहे आणि नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि महत्त्वपूर्ण भागधारक म्हणून संस्थेची सेवा करत राहीन.  हा वारसा पुढे नेण्यासाठी आमच्याकडे उत्कृष्ट व्यवस्थापन संघ आहे. संस्थापक निघून जातात पण संस्था कायमस्वरूपी फुलते. फार पूर्वी जेपी मॉर्गन आणि गोल्डमन सॅक्स सारखी नावे आर्थिक जगतात अधिराज्य गाजवताना पाहिली आणि  भारतात अशी संस्था निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले.  याच स्वप्नातून मी ३८ वर्षांपूर्वी मुंबईतील फोर्ट येथील ३०० चौरस फुटांच्या कार्यालयात ३ कर्मचाऱ्यांसह कोटक महिंद्रा ची सुरुवात केली. या अविस्मरणीय प्रवासातील प्रत्येक क्षण मी मनापासून जपला आहे.
 
 
 
विश्वास आणि पारदर्शकता या मूलभूत तत्त्वांवर स्थापन झालेली आम्ही आता एक अग्रगण्य बँक आणि वित्तीय संस्था आहोत. आम्ही आमच्या भागधारकांसाठी मूल्य निर्माण केले आहे आणि 1 लाखाहून अधिक थेट रोजगार प्रदान केले आहेत.  १९८५ मध्ये आमच्याकडे १०,००० रुपयांची गुंतवणूक आज ३०० कोटी रुपयांच्या आसपास असेल.  मला खात्री आहे की ही भारतीय मालकीची संस्था भारताच्या सामाजिक आणि आर्थिक महासत्ता बनण्यात आणखी महत्त्वाची भूमिका बजावत राहील.' असे म्हटले आहे.
 
 
मार्केट मूल्यानुसार कोटक ही भारतातील तीन क्रमांकांची खाजगी बँक आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121