मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र भाजपतर्फे राज्यात नमो आणि डीएफ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपकडून आता तरुणांना साद घालण्यात येणार असून राज्यात नमो आणि डीएफ स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.
डीएफ स्पर्धेच्या माध्यमातून निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. माजी आयपीएस अधिकारी प्रताप दिघावकरांवर या नमो चषकची जबाबदारी देण्यात आली आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून ३० हजार युवकांना जोडण्याचे भाजपचे प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे.
याशिवाय, महिलांसाठी भाजप तर्फे मुंबईत मंगळागॊर स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे. १६ आँगस्ट पर्यंत नोंदणीची अंतिम तारीख आहे. पहिले बक्षिस ३ लाख ५१ हजाराचे तर दुसरे बक्षिस २ लाख ११ हजारांचे आहे. आगामी निवडणूकांसाठी भाजपकडुन जनतेपर्यंत पोहचण्यासाठी नवे उपक्रम राबविण्यात येत आहेत. तरुणांसाठी राज्यात नमो आणि डीएफ स्पर्धेच आयोजन तर महिलांसाठी आता मंगळागॊर स्पर्धा आयोजित केली आहे.