केंद्र सरकारची मोठी कारवाई! फेक न्यूज पसरवणाऱ्या ८ यूट्यूब चॅनलवर घातली बंदी
09-Aug-2023
Total Views | 206
नवी दिल्ली : केंद्र सरकारने मंगळवारी ८ यूट्यूब चॅनलवर बंदी घातली आहे. या यूट्यूब चॅनलवर फेक न्यूज पसरवण्याचा आरोप लावण्यात आला आहे. हे यूट्यूब चॅनल भारतीय सेना, सरकारी योजना, लोकसभा निवडणुका आणि इतर अनेक गंभीर विषयांवर दिशाभूल करणारी माहिती पसरवत होते. या ८ चॅनेलचे मिळून २३ दशलक्ष सदस्य आहेत.
यहां सच देखो, कॅपिटल टीवी, केपीएस न्यूज, सरकार व्लॉग, अर्न टेक इंडिया, एसपीएन९ न्यूज, एजुकेशनल दोस्त आणि वर्ल्ड बेस्ट न्यूज अशी या चॅनेलची नावे आहेत. सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने या वाहिन्यांवरील बनावट बातम्यांची सत्यता तपासली आहे.
याआधीही भारत सरकारने खोटी माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलवर बंदी घातलेली आहे. यात काही पाकिस्तानी यूट्यूब चॅनलचा ही समावेश होता. हे पाकिस्तानी यूट्यूब चॅनल भारत सरकारच्या विरोधात खोटी माहिती पसरवण्याचे काम करत होते. त्यामुळे भारत सरकारने या चॅनलवर कारवाई केली होती.