मुंबईकरांना मालमत्ता नोंदणीकरिता अतिरिक्त शुल्क भरावे लागणार
08-Aug-2023
Total Views | 40
मुंबई : मुंबईकरांना आता मालमत्ता नोंदणीकरिता शुल्क भरावे लागणार आहे. दरम्यान, मालमत्ता नोंदणी करत असताना मालमत्ताधारकांना नियमांनुसार शुल्क भरावे लागते त्यानंतरच सदर मालमत्तेची अधिकृतरीत्या नोंदणी केली जाते. ही मालमत्ता नोंदणी कोरोना काळात मोफत होती. त्यामुळे आता मुंबईकरांना मालमत्ता नोंदणीकरिता पैसे मोजावे लागणार आहेत.
दरम्यान, मालमत्तेची ऑनलाईन नोंदणी महागणार असून याकरिता अतिरिक्त पैसे आकारले जाणार आहे, आतापर्यंत डिजिटलायझेशनसाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही सुविधा मोफत देण्यात येत होती. परंतु, आता दि. ७ जुलैपासून याकरिता १ हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे. यासोबतच ई-फायलिंग, रजा, परवाना करारासाठी अतिरिक्त ३०० रुपये मोजावे लागणार आहेत.