भारताच्या आधी 'या' देशांनी राबवल्या सौर मोहिमा! वाचा सविस्तर..
31-Aug-2023
Total Views | 81
मुंबई : चांद्रयान-३ नंतर आता भारताने सौर मोहिम हाती घेतली असून आदित्य एल-१ असे या मोहिमेचे नाव आहे. येत्या २ सप्टेंबर रोजी आदित्य एल-१ चे प्रक्षेपण होणार आहे. या प्रक्षेपणासाठी इस्त्रो पुर्णपणे सज्ज असून बुधवारी आदित्य एल-१ ची पूर्व चाचणीही करण्यात आली आहे.
श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आदित्य एल-१ चे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. भारताची ही पहिलीवहिली सौर मोहिम असून सर्वांनाच याची उत्सुकता लागली आहे. याआधी कोणकोणत्या देशांनी सौर मोहिमा राबवल्या हे आपण जाणून घेणार आहोत.
भारताच्या आधी वेगवेगळ्या देशांनी २२ सुर्य मोहिमा राबविल्या आहेत. यात अमेरिका, जर्मनी आणि युरोपियन अंतराळ संस्थांचा समावेश आहे. यापैकी सुर्याचा अभ्यास करण्यासाठी नासाने सर्वाधिक सौर मोहिमा राबवल्या असून आतापर्यंत १४ मिशन प्रक्षेपित केले आहेत.
१९९४ मध्ये युरोपियन अंतराळ संस्थेने नासासोबत मिळून सुर्य मिशन राबवले होते. त्यानंतर २००१ मध्ये नासाने जेनेसिस मिशन प्रक्षेपित केले होते. सुर्याच्या चारही बांजूना फिरुन तेथील हवेचे नमुने घेणे हा या मोहिमेचा उद्देश होता. दरम्यान, पृथ्वीपासून १.५ दशलक्ष किलोमीटरवर असलेल्या लांग्रेज पाँईंट (एल-१) वर आदित्य एल-१ चे प्रक्षेपण केले जाणार आहे. सुर्य आणि पृथ्वीच्या मध्ये हा पाँईंट आहे. सुर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल-१ सात पॅलेड्स घेऊन जाणार आहे.