निवड झालेले तरूण हे भारताचे अमृतरक्षक- पीएम मोदी
सोमवारी सरकारच्या रोजगार मेळाव्यात ५१ हजार नियुक्तीपत्र प्रदान
28-Aug-2023
Total Views | 26
निवड झालेले तरूण हे भारताचे अमृतरक्षक- पीएम मोदी
सोमवारी सरकारच्या रोजगार मेळाव्यात ५१ हजार नियुक्तीपत्र प्रदान
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे ८ व्या रोजगार मेळाव्याचे सादरीकरण आज पार पडले. पीएम मोदी यांच्या दृकश्राव्य उपस्थितीत ही नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. आज भारतात विकासाचे सामर्थ्य असून यावेळी देशात तरुणांचे भविष्य उज्ज्वल आहे. या विकासयात्रेत प्रत्येक औद्योगिक सेक्टरमधील प्रगती ही देशाला पुढे नेणार आहे. असे पंतप्रधान मोदींनी नवनियुक्तांना याप्रसंगी बोलताना सांगितले.
देशात अनेक सेक्टर विकासात बाजी मारत आहेत. यात फार्मा, ऑटोमोबाईल, टुरिझम, या क्षेत्रांचा उल्लेख त्यांनी केला. देशातील विविध ४५ ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. CRPF, CAPF, SSB, CISF,ITBP, NCB या विभागातील भरत्या नुकत्याच झाल्या आहेत.
नवीन भरती झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना 'अमृतरक्षक' म्हणून संबोधले आहे. याखेरीज पॅरा मिलेटरी फोर्सच्या भरती प्रक्रियेत बदल सरकारने बदल केले असून नजीकच्या काळात नवीन गुणवत्तेला यातून अधिक वाव मिळेल असे याप्रसंगी आवर्जून सांगितले.