महापालिकेच्या जाग्यावर बांधला मदरसा; अतिक्रमण हटवण्यासाठी चालणार बुलडोझर

    27-Aug-2023
Total Views | 550
Ghaziabad 
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याची घटना समोर आली आहे. बसपा नेते आणि माजी नगरसेवक हाजी खलील अहमद यांनी सुमारे ३० कोटी रुपयांच्या महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप आहे. यानंतर तेथे मदरसा आणि मशीद बांधण्यात आली. नंतर काही दुकाने बांधून भाड्याने दिली. आता हाजी खलील अहमद यांच्याविरोधात महापालिकेने एफआयआर नोंदवला आहे. तसेच जागा रिकामी करण्याची नोटीस दिली.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गाझियाबादच्या महापौर सुनीता दयाल यांच्याकडे २३,००० चौरस मीटर जागेवर बेकायदेशीर कब्जा झाल्याची तक्रार स्थानिक लोकांनी केली होती. महापालिकेच्या जागेवर कब्जा करून सर्वप्रथम मदरसा उभारल्याचे लोकांनी सांगितले होते. यानंतर मशीदही बांधण्यात आली. यासोबतच या जमिनीवर दुकाने थाटण्यात आली होती. नंतर त्यांना भाड्याने दिले. मदरसा कमिटीमध्ये खलील अहमद मुख्य भूमिकेत होता.
 
या प्रकरणी महापौर सुनीता दयाल यांनी सांगितले की, या जागेची किंमत सुमारे ३० कोटी रुपये आहे. ही मशीद २०० चौरस मीटर परिसरात बांधली आहे. उरलेल्या जागेवर दुकान व बेकायदा बांधकामांशिवाय बेकायदा पार्किंगही सुरू आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोपी हाजी खलील अहमदविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. जमीन रिकामी करण्याची नोटीस २ दिवसांत दिली जाईल.
 
नोटीस आणि इशारा देऊनही जागा मोकळी न केल्यास बुलडोझरचा वापर करून बेकायदा अतिक्रमण हटविले जाईल, असेही महापौरांनी सांगितले आहे. यासोबतच हाजी खलील अहमद याला अटक करण्यात येणार आहे. दुसरीकडे, महापालिकेचे मालमत्ता अधीक्षक भोलानाथ गौतम यांनी कोतवाली येथील आरोपी माजी नगरसेवक हाजी खलील अहमदविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
 
भोलानाथ गौतम यांचे म्हणणे आहे की, खलील अहमद येथील रहिवासी कैला भट्ट यांनी खसरा क्रमांक-२१३ येथील २.३३४० हेक्टर जागेवर कब्जा करून बेकायदेशीरपणे दुकान बांधले आहे. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121