नवी दिल्ली : इस्त्रोकडून विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी तयारी सुरु झाली असून काऊंटडाऊन सुरु झाले आहे.येत्या काही मिनिटात यान लँडिंग करण्याची शक्यता आहे. दरम्यान, चांद्रयान ३ च्या माध्यमातून भारत आपले यान दक्षिण ध्रुवावर उतरविण्यास सज्ज झाला आहे. त्यामुळे आजचा दिवस भारतासाठी गौरवपूर्ण आहे. सायंकाळी ०६ वाजून ०४ मिनिटांनी यानाचे लँडिंग होणार आहे. विक्रम लँडर ज्यावेळी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल त्यावेळी रोव्हर आणि लँडर याच्या बाह्य भागाची विशेष काळजी घेतली जाणार आहे.
दरम्यान, लँडिंगच्या वेळी चंद्राच्या पृष्ठभागावरील धूळीमुळे वातावरणात त्याचे कण पाहायला मिळतील. त्यामुळ यानाच्या लँडिंगवेळी धुळीमुळे रोव्हर आणि लँडरला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे इस्त्रोच्या शास्त्रज्ञांकडून याबाबत विशेष काळजी घेतली जाणार आहे. बंगळुरुच्या सेंटरमधून यानाला कंमांड दिली गेली असून निर्धारित वेळेत यान लँडिंग करणार आहे. चांद्रयान २ च्या दरम्यान झालेल्या चुकांवर काम करण्यात आले असून यावेळी अद्यायवत तंत्रज्ञानाच्या मदतीने मोहीम यशस्वी करण्याचा इस्त्रोचा प्रयत्न असणार आहे.