विरोधकांची एकजूट ही मजबूरीच! काँग्रेस नेत्यानं दिली कबुली
02-Aug-2023
Total Views |
मुंबई : विरोधी पक्षांनी काही दिवसांपूर्वीच बंगलोरमध्ये इंडिया नावाने आघाडी स्थापन केली आहे. त्यावेळी ही आघाडी स्थापन करण्याचा उद्देश देशातील जनतेच्या कल्याणासाठी आणि सेवेसाठी आहे, असं विरोधी पक्षातील नेते म्हणाले होते. पण आता भाजपाचे प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी विरोधकांचा खोटारडेपणा समोर आणण्यासाठी एक व्हीडिओ शेयर केला आहे.
Candid confession by one of the tallest Congress leaders in Lok Sabha - Adhir Ranjan Choudhary ji
We have formed the I-N-D-I- alliance in “majboori” - we can’t defeat Modi - Shah so we all came together to stop them
— Shehzad Jai Hind (Modi Ka Parivar) (@Shehzad_Ind) August 2, 2023
या व्हीडिओमध्ये काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी हे एएनआयच्या एका शोमध्ये बोलत आहेत. त्यांना प्रश्न विचारला जातो की, काँग्रेसला विरोधकांची आघाडी बनवण्याची का गरज पडत आहे? त्यावर त्यांनी दिलेले उत्तर सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
अधीर रंजन चौधरी म्हणतात की, मोदींना हरवण्यासाठी काँग्रेसला विरोधकांसोबत आघाडी करणे गरजेचे आहे. राजकारणात आपल्याला मजबूरीत अनेक निर्णय घ्यावे लागतात. आमचा विरोधकांसोबत आघाडी करण्याचा निर्णयही राजकीय मजबूरीच आहे. आम्हाला काही करुन मोदींना हरवायचे आहे.