एएससीआयने आरोग्य व फायनान्शियल इन्फ्लूएंझर्सवर टाकली अतिरिक्त जबाबदारी; इन्फ्लूएंझर्ससाठी मार्गदर्शकतत्त्वे सादर
- आरोग्य व फायनान्शियल इन्फ्लूएंझर्सनी संबंधित समर्थनांवर पात्रता व नोंदणी माहिती सादर करणे आवश्यक आहे
मुंबई : अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडिया (एएससीआय) ने आपल्या जाहिरात मार्गदर्शकतत्त्वांमध्ये नवीन सुधारणा केली आहे, ज्याअंतर्गत आरोग्य व फायनान्स इन्फ्लूएंझर्सवर त्यांच्या जाहिरात कन्टेन्टबाबत अतिरिक्त जबाबदारी टाकण्यात आली आहे. सुरूवातीला मे २०२१ मध्ये सादर करण्यात आलेल्या या मार्गदर्शकतत्त्वांचा ग्राहकांना प्रमोशनल कन्टेन्ट ओळखण्यास, तसेच उत्पादने किंवा सेवांबाबत योग्य निर्णय घेण्यास मदत करण्याचा उद्देश आहे. डिजिटल व्यासपीठांचे झपाट्याने बदलत असलेले स्वरूप आणि व्यापक परिणाम लक्षात घेत ही मार्गदर्शकतत्त्वे डिझाइन करण्यात आली आहेत.
बँकिंग,फायनान्शियल सर्विसेस् व इन्शुरन्स (बीएफएसआय)आणि आरोग्य व पोषण उत्पादने व सेवा अशा श्रेणींमधील चुकीच्या व फसव्या जाहिरात कन्टेन्टचा ग्राहकांचे स्वास्थ्य व आर्थिक सुरक्षिततेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. या अपडेट्ससंदर्भात बीएफएसआय क्षेत्रामध्ये कार्यरत 'फिनइन्फ्लूएर्स' म्हणून ओळखले जाणारे फायनान्शियल प्रभावक आता सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) सहनोंदणी झाल्यानंतरच गुंतवणूक-संबंधित सल्ला देऊ शकतात.
त्यांचा नोंदणी क्रमांक त्यांच्या नावासोबत आणि पात्रतेसोबत ठळकपणे प्रदर्शित करणे आवश्यक आहे. इतर आर्थिक सल्ल्यासाठी प्रभावकांकडे इन्शुरन्स रेग्युलेटरी अॅण्ड डेव्हलपमेंट ऑथोरिटी ऑफ इंडिया (आयआरडीएआय) कडून परवाना असे योग्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, तसेच ते चार्टर्ड अकाऊंटण्ट म्हणून पात्र असणे आणि कंपनीचे सचिव असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त त्यांनी वेळोवेळी आर्थिक सेवा नियामकांनी निर्धारित केलेल्या सर्व पूर्व अपेक्षांचे पालन करण्याची अपेक्षा आहे.
त्याचप्रमाणे, आरोग्य व पोषणावर दावे करणाऱ्या उत्पादनांना मान्यता देणाऱ्या प्रभावकांकडे प्रदान करण्यात आलेल्या सल्ल्याच्या स्वरूपानुसार वैद्यकीय पदवी किंवा नर्सिंग,पोषण,डायटेटिक्स, फिजिओथेरपी,मानसशास्त्र इ. मधील प्रमाणपत्र यांसारखी संबंधित पात्रता असणे आवश्यक आहे.अशा पात्रता स्पष्टपणे सादर करणे आवश्यक आहे.
आरोग्य व फायनान्स प्रभावकांसाठी अस्वीकृती आवश्यकता
प्रभावकांनी सर्व प्रकारच्या प्रमोशनल कन्टेन्टमध्ये त्यांची पात्रता आणि नोंदणी/प्रमाणपत्राबाबत माहिती सादर करणे आवश्यक आहे:
● व्हिज्युअल्सवर स्पष्टपणे दिसणारे असावे किंवा व्हिडिओंमध्ये सुरूवातीचा रिमार्क म्हणून उल्लेखन केलेले असावे.
● ब्लॉग्स व कोणत्याही मजकूर-आधारित पोस्ट्ससंदर्भात ते ग्राहक पोस्ट वाचण्यापूर्वीच सांगण्यात आले पाहिजे.
● पॉडकास्ट्स किंवा सुस्पष्ट ऑडिओ माध्यमासंदर्भात ते जाहिरात कन्टेन्टच्या सुरूवातीला सादर केले पाहिजे.
उल्लेखनीय बाब म्हणजे ११ ऑगस्ट २०२३ रोजी ग्राहक व्यवहार विभागाने आरोग्य व वेलनेस उत्पादने आणि सेवांचे समर्थन करताना अतिरिक्त खुलासे अनिवार्य करण्यासाठी आपल्या प्रभावक मार्गदर्शकतत्त्वांचा विस्तार केला. मार्गदर्शकतत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांना ग्राहक संरक्षण कायदा (२०१९)अंतर्गत दंडाला सामोरे जावे लागू शकते.
एएससीआयची मार्गदर्शकतत्त्वे जाहिरात कन्टेन्टशी संबंधित आहेत, जेथे ब्रॅण्ड किंवा उत्पादन किंवा सेवेचा प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे प्रचार केला जात आहे आणि ब्रॅण्ड व प्रभावक यांच्यात प्रत्यक्ष संबंध आहे.
एएससीआयच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व महासचिव मनिषा कपूर म्हणाल्या, 'आरोग्य व फायनान्स श्रेणींमधील चुकीच्या सल्ल्यामुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे या दोन महत्त्वपूर्ण श्रेणींमधील इन्फ्लूएंझर्स सल्ला देण्यासाठी पात्र असणे आवश्यक आहे. तसेच ते अशा प्रकारच्या जाहिरात पोस्ट्स सादर करतात तेव्हा या पात्रता स्पष्टपणे सादर केल्या पाहिजेत. या क्षेत्रांमध्ये 'वन साइज फिट्स ऑल' दृष्टीकोन धोकादायक असू शकतो आणि ग्राहकांना या श्रेणींमधील ब्रॅण्ड्स किंवा उत्पादनांशी संलग्न होताना फक्त पात्र तज्ञांच्या सल्ल्याचे पालन केले पाहिजे. ग्राहकांना सेलिब्रिटीज कोणत्या क्षेत्रामधून आहेत हे माहित असते, पण कदाचित त्यांना योग्य सल्ला देण्यासाठी आणि कोणत्याही संबंधित जोखीमांबाबत माहिती देण्यासाठी आवश्यक पात्रता व कौशल्य कोणत्या प्रभावकांमध्ये आहे हे माहित नसू शकते. तज्ञ नसलेल्या इन्फ्लूएंझर्सच्या सल्ल्याच्या परिणामांपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी आरोग्य व फायनान्शियल इन्फ्लूएंझर्सनी आता या अतिरिक्त आवश्यकतांचे पालन केले पाहिजे.'