चंडीगड : हरियाणा एसटीएफ आणि पोलिसांच्या पथकाने नूह हिंसाचार प्रकरणातील आरोपींना पकडण्यास सुरुवात केली आहे. यातच आता पोलिसांनी फिरोजपूर येथून अफझलला अटक केली आहे. अफझलने इंटरनेटवर प्रक्षोभक व्हिडिओ आणि ऑडिओ संदेश पोस्ट केले होते.
आरोपी अफजलवर नूह हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोड आणि इंटरनेटवर 'मेवत का बदला' नावाने व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप आहे. अफजल हा नूहला लागून असलेल्या फिरोजपूर गावचा रहिवासी आहे. सायबर सेलने त्याच्याविरुद्ध दोन एफआयआर नोंदवले आहेत.
मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, घटनेच्या दिवशीच अफझलने स्वतः दोन व्हॉट्सअॅप ग्रुपवर एक भडकाऊ संदेश पोस्ट केला होता. त्यात खेडला चौकात फक्त २-४ लोक मारले गेले असा संदेश होता, जेव्हा यात्रा भादसला पोहोचेल तेव्हा २०-३० लोकांना (२०-३० हिंदू) मारावे लागतील असं तो व्हीडिओत बोलताना दिसत आहे.
अफझल आणि त्याच्या दंगलखोरांच्या टोळीने नूह दंगलीचे व्हिडिओ आणि छायाचित्रे काढणाऱ्या मीडिया कर्मचा-यांचे मोबाईलही लुटल्याचे वृत्तात सांगितले जात आहे. तो स्वत: व्हिडिओ बनवून वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये शेयर करत होता.