राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज'

    12-Aug-2023
Total Views | 37
Maharashtra Students Innovation Challenge


मुंबई
: राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी ‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज' चे आयोजन केले आहे राज्यातील महाविद्यालय व औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दि. 31 ऑगस्ट, 2023 पर्यंत व शैक्षणिक संस्थांना दि. 15 ऑगस्ट, 2023 पर्यंत अर्ज सादर करून सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त रवींद्र सुरवसे यांनी केले आहे.

राज्यातील नावीन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नावीन्यपूर्ण स्टार्टअप धोरण 2018 जाहीर करण्यात आले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी ही नोडल एजन्सी कार्यरत आहे.
 
'महाराष्ट्र स्टुडंट 'इनोव्हेशन चॅलेंज’ च्या माध्यमातून आयोजित नवउद्योजक स्पर्धेत राज्यातील महाविद्यालय व औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दि.31 ऑगस्ट, 2023 पर्यंत व शैक्षणिक संस्थांना 15 ऑगस्ट, 2023 पर्यंत अर्ज सादर करून सहभाग नोंदविता येणार आहे.

या स्पर्धेमध्ये उमेदवार वैयक्तिक अथवा कमाल जणांच्या समूहामध्ये सहभागी होऊ शकणार असून उमेदवार तसेच शैक्षणिक संस्थांनी https://schemes.msins.in या संकेतस्थळाला भेट देऊन विहित मुदतीत स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजमध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहायक आयुक्त  रवींद्र सुरवसे यांनी केले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

कुंचीकोरवे कैकाडी समाजाची ‘आखाडी जत्रा’ ही केवळ धार्मिक परंपरा नसून, समाजाच्या अस्मितेचा, श्रद्धेचा आणि सांस्कृतिक सातत्याचा जिवंत पुरावा आहे. संत कैकाडी महाराज यांची शिकवण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील योगदानाची परंपरा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन हा समाज सुसंस्कृत, जागरूक आणि समर्पित वाटचाल करीत आहे. हा विशेष लेख या परंपरेचा आणि समाजाच्या सांस्कृतिक-सामाजिक प्रवासाचा साक्षीदार ठरत, त्या अखंड परंपरेच्या गौरवाचा दस्तऐवज ठरावा, हाच उद्देश...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121