'ओएमजी २' चित्रपटाला ‘अ’ श्रेणीचा दर्जा, प्रदर्शनाचा मार्ग झाला मोकळा

    01-Aug-2023
Total Views | 62

omg 2 




मुंबई :
अभिनेता अक्षय कुमारचा 'ओह माय गॉड २' हा चित्रपट गेले अनेक दिवस चर्चेचा विषय ठरला होता. चित्रपटाचा विषय, त्यातील अक्षयची भूमिका आणि अशा अनेक विषयांमुळे चित्रपटाला थेट कोर्टाची पायरी देखील चढावी लागली होती. सेन्सॉर बॉर्डाच्या कात्रीत सापडलेल्या 'ओएमजी २' चित्रपटाची आता सुटका झाली असून सेन्सॉर बॉर्डाने चित्रपटाचा 'अ' श्रेणीचा दर्जा दिला असून १८ वर्षांवरील प्रेक्षकांनाच हा चित्रपट पाहता येणार आहे. सेन्सॉरने या पुर्वी चित्रपटातील काही सिन्स कट करण्यास सांगितले होते. परंतु कोणताही सीन जरी कट केला नसला तरी चित्रपटात २७ बदल करण्याचे आदेश मात्र देण्यात आले आहेत.
 
 
'ओएमजी २' या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित राय यांनी केले असून २०१२ साली आलेल्या 'ओएमजी' या चित्रपटाचा तो दुसरा भाग आहे. मात्र, परेश रावल यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'ओएमजी' या चित्रपटाचा आस्वाद सर्व वयोगटातील प्रेक्षकांनी घेतला होता, त्यामुळेच या चित्रपटाच्या पुढच्या भागाची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. मात्र, चित्रपटात केला जाणारा हा इतका मोठा बदल आणि त्यातही परेश रावल यांची चित्रपटातील अनुपस्थिती अभिनेते पंकज त्रिपाठी कितपत पेलवण्यास यशस्वी ठरतात हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच स्पष्ट होईल. ११ ऑगस्ट रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार असून याच दिवशी 'गदर २' चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे 'ओएमजी २' चित्रपटापुढे आणखी एक चॅलेंज आहे असेच म्हणावे लागेल.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121