अॅक्शन हिरो म्हणून जगभरात ख्याती असलेला हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रुझचे चाहते कायमच त्याच्या नव्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहात असतात. महत्वाचे म्हणजे त्यांच्या प्रत्येक चित्रपटातील धोकादायक स्टंट तो स्वत: करत असतो. आता पुन्हा एकदा त्याचा अॅक्शनपट मिशन इम्पॉसिबल 7 प्रदर्शित होणार असून यातही त्याने अनेक स्टंट केले आहेत. हा चित्रपट येत्या 12 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. दरम्यान, या चित्रपटात एका सीनसाठी खऱ्या ट्रेनचा चुराडा केला आहे. नुकताच या चित्रपटातील व्हिडिओ समोर आला आहे.
गेली अनेक वर्ष टॉम क्रुझ 'मिशन इम्पॉसिबल' श्रृंखलेतून चाहत्यांचे मनोरंजन करत आला आहे. आता या श्रृंखलेचा 7 वा भाग प्रदर्शित होत असून टॉमने अत्यंता धोकादायक स्टंट केले आहेत. यातील एका स्टंटमध्ये एक नवीन ट्रेन ब्रिजवरुन खाली पाडण्यात आली आहे. इतर चित्रपटांमध्ये ट्रेनच्या सीनसाठी व्हिएपएक्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. पण, या चित्रपटात एक नवीन ट्रेन तयार करण्यात आली आली असून तिच्या साहाय्याने हा स्टंट टॉम क्रुझने केला आहे.
टॉम क्रुझने या चित्रपटातील बिहाइंड द सीन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अॅक्शन सीनसाठी एक नवीन ट्रेन बनवलेली दिसत आहे. ही ट्रेन साधी सुधी नसून अत्यंत आलिशान आहे. व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की या ट्रेनवर एक फाईटसीनदेखील शूट झाला आहे. यानंतर ही ट्रेन अतिशय उंचावरुन खाली पाडण्यात आली आहे. यात ट्रेनचा चुराडा झाला आहे.