अक्षय कुमार पुन्हा आपल्या पायावर धोंडा मारणार?

    31-Jul-2023
Total Views |

akshay kumar and sunny deol 



रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : चित्रपट म्हणजे मनोरंजनातून प्रबोधन करणारे माध्यम आहे. आणि गेल्या अनेक वर्षांपासून विविध विषय वेगवेगळ्या पद्धतीने हाताळत प्रेक्षकांना त्याबद्दल माहिती देण्याचे काम लेखक दिग्दर्शक आणि कलाकार करत असतात. नव्या कथा, विषय, आशय आणि कलाकार यांच्या साच्यातून नवे चित्रपट एकीकडे येत असताना दुसरीकडे मात्र, जुन्या चित्रपटांचा रिमेक किंवा एखाद्या चित्रपटाच्या भागांची शृंखला हिंदी चित्रपट साकारताना दिसत आहेत. गेली ३० वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक यशस्वी चित्रपट प्रेक्षकांना देणाऱ्या अक्षय कुमारच्या पाठीमागे अलीकडच्या काळात जनु काही साडेसाती लागली आहे असेच वाटते. ‘हेरा फेरी’, ‘मोहरा’, ‘भूल भूलैया’, ‘स्पेशल २६’, ‘एअर लिफ्ट’, यासारखे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या अक्षयने गेला काही काळ फ्लॉप चित्रपटांचा सपाटाच लावला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
 
तर, २०१२ साली ‘ओह माय गॉड’ हा अभिनेते परेश रावल आणि अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला चित्रपट प्रदर्शित झाला होता. नास्तिक व्यक्ती त्याचे दुकान पाडले म्हणून थेट देवालाच कोर्टाची पायरी चढायला लावतो आणि मग पुढे मानवरुपात देवाची भूमिका साकारणारा अक्षय कुमार या चित्रपटात काय धमाल आणतो असे या चित्रपटाचे कथानक होते. परेश रावल यांचा अप्रतिम अभिनय खऱ्या अर्थाने अक्षयच्या सोबत असल्यामुळे हा चित्रपट अधिक चालला ही सत्य परिस्थिती आहे. आता तब्बल ११ वर्षांनंतर ‘ओएमजी’ या चित्रपटाचा दुसरा भाग ‘ओह माय गॉड २’ प्रेक्षकांच्या भेटीला ११ ऑगस्टला येणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या पोस्टरवरुन वादंग निर्माण झाला होता. इतकेच नव्हे तर सेन्सॉर बॉर्डाच्या कात्रीतही हा चित्रपट अडकल्यामुळे ११ वर्षांपुर्वी प्रेक्षकांच्या मनात घर करुन बसलेल्या या चित्रपटाची दुर्दशा ‘ओएमजी २’ करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या कथानकाकडून आणि अक्षयच्या अभिनयाबद्दल प्रेक्षकांना अपेक्षा आहेत.
 
एकीकडे चित्रपटाच्या अनेक गोष्टींमुळे वाद सुरु असताना दुसरी गोष्ट या चित्रपटाच्या फ्लॉप ठरण्याला कारणीभूत ठरु शकते ती म्हणजे ‘गदर २’ चित्रपट देखील ११ ऑगस्ट रोजीच देशभरात प्रदर्शित होणार आहे. २२ वर्षांपुर्वी भारतीयांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण करणाऱ्या 'गदर- एक प्रेम कहानी' या चित्रपटाचा फॅन फॉलॉईंग वयोवृद्धांपासून आजची तरुण पिढी देखील तितकीच आहे. त्याशिवाय २२ वर्षांनंतर 'गदर-२' मधून अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांची जोडी रुपेरी पडद्यावर झळकणार असल्यामुळे या चित्रपटाच्या पुढे अक्षयचा 'ओएमजी २' टिकणार का? असा प्रश्न उभा राहिला असून अक्षय पुन्हा एकदा आपल्या पायावर धोंडा मारुन घेणार का हा विचार देखील येतो. ‘बच्चन पांडे’, ‘रक्षाबंधन’, ‘रामसेतू’, ‘सम्राट पृथ्वीराज’, अशा फ्लॉप चित्रपटांच्या यादीत ‘ओह माय गॉड २’ चा समावेश होणार का हे आता येणारा काळच ठरवेल.
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121