अभिनेते रजनीकांत म्हणाले 'मी दारू पिणं सोडलं असतं तर...'

    30-Jul-2023
Total Views | 232
Alcoholism is the biggest mistake I made in my life says Rajinikanth

नवी दिल्ली
: जगभरात लोकप्रिय असलेले थलायवा रजनीकांत सध्या चर्चेत आहे. ते म्हणाले की, ' मला दारूचं व्यसन नसतं तर मी समाजासाठी आणखी चांगलं काम केलं असतं. करिअरकडे लक्ष दिलं असतं. दारु पिणं ही माझ्या आयुष्यातील मोठी चुक आहे. व्यसन नसतं तर मी समाजसेवा केली असती. दारू पुर्णपणे सोडा असं नाही. पण नियमित मद्यपान करू नका. दारू तुमचा आनंद आणि आरोग्य खराब करु शकते' असा सल्ला ही त्यांनी आपल्या चाहत्यांना दिला आहे.

अलीकडेच चेन्नईमध्ये रजनीकांत यांच्या 'जेलर' चित्रपटाचा ऑडिओ लॉन्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचवेळी रजनीकांत यांनी त्याच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी शेअर केल्या. यादरम्यानच रजनीकांत आपल्या मद्यपानाच्या समस्येबद्दल उघडपणे बोलले आणि ही त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचे म्हटले.त्यामुळे जर दारू नसती तर करिअरमध्ये खूप चांगली कामगिरी केली असती आणि तो आजच्यापेक्षा मोठा स्टार बनलो असतो, असेही ते म्हणाले.
 
याआधी ही रजनीकांतने २०१८ मध्ये आलेल्या 'काला' चित्रपटात दारूबंदीबद्दल बोलले होते. या चित्रपटातील पात्र त्यांच्या मद्यधुंद अवस्थेतील निष्काळजीपणामुळे आपल्या पत्नीला गमावतो. त्यामुळे अभिनेत्याने दारूच्या दुष्परिणामांबद्दल बोलण्याची ही पहिलीच वेळ होती. पूर्वीपर्यंत ते दारू आणि सिगारेटला स्टाइल स्टेटमेंट म्हणून सादर करायचे.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121