ब्रेकींग! राज्यात प्रो दहीहंडी स्पर्धा सुरू होणार?

    25-Jul-2023
Total Views | 35
Pro DahiHandi Competition In Maharashtra Coming Soon

मुंबई
: दहीहंडी सण जवळ आला असून आता राज्य सरकार यासंदर्भात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. यामुळे दहीहंडी पथकांना याचा फायदा होणार आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. दहीहंडी सणाला साहसी खेळाचा दर्जा मिळाला असून प्रो दहीहंडी स्पर्धा सुरु करण्याच्या तयारीत राज्य सरकार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात प्रो दहीहंडी स्पर्धा सुरू करण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची महत्वाची बैठक विधनभवनात होणार असून या बैठकीत प्रो दहीहंडीबद्दलच्या नियमावलीवर चर्चा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे राज्यात आता प्रो कबड्डी लीगच्या धर्तीवर प्रो दहीहंडी स्पर्धा सुरू होण्याची शक्यता आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121