शेणही खाल्ले! छत्तीसगढमध्ये काँग्रेसवर 229 कोटींच्या शेण घोटाळ्याचा आरोप

    25-Jul-2023
Total Views | 698
 Bhupesh-Baghel-Rahul-gandhi
रायपूर : छत्तीसगढमध्ये शेण खरेदीत मोठा घोटाळा समोर आला आहे. राज्यातील शेण खरेदी हा बिहारमधील चारा घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा असल्याचा आरोप भाजपच्या आमदारांनी केला आहे. विरोधी पक्षनेते नारायण चंदेल म्हणाले की, शेणखरेदीत चुकीची माहिती देण्यात आली आहे.
 
तर या आरोपांवर मंत्र्यांनी सांगितले की, राज्यात १०,३३६ शेणखरेदी केंद्र मंजूर करण्यात आली आहेत, त्यापैकी १०,२२४ शेणखरेदी केंद्र बनवण्यात आली. २ जानेवारी २०१९ ते ३० जून २०२३ पर्यंत एकूण १,२३,१९,८४५.६४ क्विंटल शेणखत सरकारने खरेदी केले असून, त्यासाठी २४६ कोटी एवढी रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. १७ कोटींहून अधिक किमतीच्या शेणाची विक्री झाली आहे.
 
यावर सौरभ सिंह म्हणाले की, सुमारे २४६ कोटींचे शेण खरेदी केले आहे आणि १७ कोटींचे शेण सरकारने विकले आहे, मग उरलेल्या २२९ कोटींचे शेण कुठे गेले? शिवरतन शर्मा म्हणाले की, शेण खरेदीमध्ये मोठा घोटाळा सुरू आहे. यावर छत्तीसगढच्या कृषीमंत्र्यांना कोणतेही उत्तर देता आले नाही.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121