मुंबई : मनसे नेते अमित ठाकरे यांची गाडी समृध्दी महामार्गावरील टोल नाक्यावर ३ मिनिटांसाठी थांबवण्यात आली. यामुळे मनसैनिकांनी आक्रमक होत टोलनाका फोडला. यावर भाजपाने ट्विट करत निशाणा साधला आहे. अमीत ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा. असं म्हणत भाजपाकडुन व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे.
व्हिडीओतुन म्हटले आहे की, अमित ठाकरे टोल फोडणे म्हणजे राजकारण नाही. अमित ठाकरे, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, सिन्नरमधील टोलनाका फोडतानाची दृष्य दाखवण्यात आली आहेत. त्या टोलनाक्यावर फासटॅग संबंधी काही अडचणी होत्या, त्यामुळे सर्वच गाड्या थांबवण्यात येत होत्या. यानंतर व्हिडीओत टोलनाका तोडफोडीवर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया दाखवली आहे. टोलनाका फोडल्यावर प्रतिक्रिया देतानाचा आनंद अमित ठाकरेंना लपवता आला नाही. हे सरकार जनसामान्यांच सरकार आहे. कोणा एका नेत्यासाठी किंवा त्याच्या मुलासाठी इथे वेगळे नियम पाळले जाणार नाहीत. अमित ठाकरे हा टोल बंद ही पडला नाही आणि तुम्ही नियमाप्रमाणे टोलही भरला नाही. पण दादागिरी भाजपा सरकार चालु देणार नाही.' असं व्हिडीओतुन मनसे ला बजावण्यात आलं आहे.