अजितदादांच्या विधानपरिषदेत ३ मोठ्या घोषणा! पूरग्रस्तांना मिळणार लाखोंची मदत
24-Jul-2023
Total Views | 60
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज, २४ जुलै रोजी विधानपरिषदेत ३ मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्यात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाल. पुरात अनेकजण वाहून गेली. तसेच अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे गावकऱ्यांचं घरादाराचं नुकसान झालं. यावर अजित पवार यांनी तातडीची मदत जाहीर केली आहे.
“१९ जुलैला राज्याच्या विविध जिल्ह्यांत अतिवृष्टीजनक पाऊस पडला. यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस पडला. यवतमाळमध्ये ११० नागरिकांना एनडीआरएफने बाहेर काढले. हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली. पूरग्रस्तांना तातडीची १०हजार रुपयांची मदत करणार, दुकानांचं नुकसान झाल्यास ५०हजारांची मदत केली जाणार आणि पुरात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना ४ लाखांची मदत दिली जाईल." असे पवारांनी सांगितले.
“धोकादायक परिस्थितीत असलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात यावं. पूरपरिस्थितीत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना तातडीने 4 लाखांची मदत देण्यात यावी. शेती-पिकांच्या नुकसानीचे पंचवाने तातडीने घ्यावेत. या अवकाळी पावसात मृत पावलेल्यांना तातडीने ४ लाखाची मदत जाहीर केलीय. तातडीने पिक पंचनामे काढण्याचे निर्देश दिले आहेत. पुरात घराचं नुकसान झालेल्यांना 5 ऐवजी 10 हजारांचं सानुग्रह अनुदान मदत देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यात १०२ मिलीमीटर पाऊस पडला. तेथे नदी-नाल्यांना पूर आला होता. वाशिममध्ये १३९.७ मिलीमीटर पाऊस पडला. वेगवेगळ्या जिल्ह्यात मदतकार्य पथक ही तैनात करण्यात आली. ज्यांच्या घरात पुराचं पाणी शिरलं त्यांना सध्याच्या दराने 5 हजारने सानुग्रह देण्याची कारवाई सुरु करायची, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा सानुग्रह 10 हजार देण्याचा आताच निर्णय घेण्यात आला." असं अजित पवार विधानपरिषदेत म्हणाले.