मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून अभिनेत्री रिया चक्रवर्तीला दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून जामिनावर सुटका करण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने अखेर मान्य केली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे की, ड्रग्जशी संबंधित चौकशीच्या संदर्भात रियावर नोंदवलेल्या खटल्यांमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने रियाला दिलेल्या जामिनाला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आव्हान देणार नाही. या निर्णयानंतर रिया चक्रवर्ती हिला दिलासा मिळाल्याचे म्हटले जात आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने रिया चक्रवर्तीला जामिनावर सोडण्याचे आदेश देताना असे म्हटले होते की, एनडीपीएस कलम २७ अ अन्वये, अवैध तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांना आश्रय दिल्याच्या गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त २० वर्षांसाठी तुरुंगवास होऊ शकतो. २०२० मध्ये रिया चक्रवर्तीला जामीन मंजूर करताना मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले होते की, ड्रग्ज खरेदी करण्यासाठी पैसे पुरवण्याचं अर्थ ड्रग्जची तस्करी करणे असे होता नाही. तसेच उच्च न्यायालायाने यावर म्हटले होते की, ड्रग्जचे सेवन करण्यासाठी एखाद्याला पैसे दिल्याचा अर्थ त्याला तसे करण्यासाठी प्रोत्साहन दिले असेही होत नाही.