तडजोड करावी लागली तर घरात बसेन, पण व्यभिचार नाही : राज ठाकरे

    13-Jul-2023
Total Views | 107

Raj Thackeray 
 
 
मुंबई : तडजोड करावी लागली तर घरात बसेन, पण व्यभिचार नाही. असं स्पष्ट मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. राज ठाकरे हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. चिपळूणमध्ये त्यांनी आज दि. १३ जुलै रोजी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. येत्या पंधरा दिवसांमध्ये राज ठाकरे पक्षाचा मेळावा घेणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी आज चिपळूणमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
 
 
 
राज ठाकरे म्हणाले की, "राज्यात जो राजकीय व्याभिचार सुरु आहे तो मी करणार नाही. मला तडजोड करावी लागली तर मी घरात बसेन पण तडजोड करणार नाही. कार्यकर्त्यांनी मनाने एकत्र येऊन काम करणं आवश्यक आहे. पक्ष सांगेल ते काम करावं लागेल अन्यथा पदावर राहता येणार नाही. आपण आपला विचार पोहोचवण्याची आवश्यकता असून पदाधिकाऱ्यांनी पदांनी एकमेकांशी बोलण्याऐवजी मनांनी एकमेकांशी बोलणं गरजेचं आहे."
 
चिपळूणमधील पदाधिकाऱ्यांच्या दौऱ्यानंतर राज ठाकरे पुढे खेड, दापोलीकडे रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी अविनाश जाधव, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांची उपस्थिती आहे.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121